रांजणगांव ला चारशे महिलांची मोफत तपासणी

रांजणगाव गणपती,ता.९ मार्च २०१७ (प्रतिनीधी) : रांजणगांव गणपती येथील गजानन हॉस्पिटल ला जागतिक महिला दिनानिमित्त ४०० महिलांनी मोफत अारोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला असल्याची माहिती डॉ.अंकुश लवांडे यांनी दिली.

रांजणगांव गणपती येथील गजानन हॉस्पिटल येथे अायोजित केलेल्या मोफत अारोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई पाचुंदकर यांच्या हस्ते  शिबिराचे उद्घाटन करण्यात अाले.यानंतर महिलांची अारोग्यातपासणी करण्यात अाली.दिवसभर चाललेल्या या शिबिरात प्रामुख्याने महिलांची हाडांची तपासणी करण्यात अाली.या वेळी परिसरातील सुमारे चारशे च्या वर महिलांनी अारोग्यतपासणी चा लाभ घेतला.

या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई पाचुंदकर बोलताना म्हणाल्या कि, महिलांनी रोजच्या कामाच्या धावपळीत स्वत:च्या अारोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असुन स्वत:चे अारोग्य चांगले असेल तरच कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले राहते.तसेच गजानन हॉस्पिटल ने गोरगरीबांसाठी सुरु केलेले रुग्णालय हे गरिबांचेच रुग्णालय असुन ख-या अर्थाने समाजाच्या गरीब घटकांसाठी वरदान अाहे.महिलादिनी सुरु केलेला उपक्रम हा स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार ही त्यांनी काढले.

या वेळी रुग्णालयाचे प्रमुख डॉ.अंकुश लवांडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि,बदलती जीवनशैली,महिलांचे स्वत:कडे होणारे दुर्लक्ष यांमुळे विविध अाजारांना सामोरे जावे लागत अाहे.बरेचसे  अाजार हे लवकर निदान न केल्याने व दुर्लक्ष केल्याने वाढत जातात.त्या मुळे महिलांनी वेळोवेळी अारोग्याची काळजी घेणे गरजेचे अाहे.तसेच गजानन हॉस्पिटलच्या वतीने देखिल अागामी काळात गोरगरीबांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

या वेळी रुग्णालयातील कर्मचारी, महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या

रांजणगांव गणपती परिसरातील गजानन हॉस्पिटल येथे गरीब व गरजु रुग्णांना अत्यल्प दरात वैद्यकिय  सुविधा दिल्या जात अाहेत.त्याचप्रमाणे या ठिकाणी डिजीटल एक्स-रे,रक्त तपासणी,मधुमेह तपासणी, तातडीच्या वैद्यकिय सुविधा,सुसज्ज अॉपरेशन थिएटर, अादी सुविधा देखिल उपलब्ध अाहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री गजानन हॉस्पिटल,
पुणे-नगर महामार्गालगत रांजणगांव गणपती,
ता.शिरुर जि.पुणे

मो.नं : ९३७१०४२७९२

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या