...अखेर तो फलक लागला झळकु

कवठे येमाई,ता.१० मार्च २०१७ (प्रा.सुभाष शेटे) : शिरूर-मंचर-राजगुरूनगर रस्त्यावर मलठणजवळ दिशादर्शक फलक  झुडपांच्या आड गेल्या असल्या बाबतच्या संकेतस्थळ www.shirurtaluka.com च्या वृत्ताची दखल घेत  या फलकाच्या सभोवताली वाढलेली झाडे-झुडपे काढून टाकण्यात आली अाहे.

मंचर,कवठे,मलठण मार्गाने ओझर,लेण्याद्री या अष्टविनायनक गणपतींचे दर्शन घेऊन श्री क्षेत्र रांजणगाव गणपती,थेऊर,मोरगाव व सिद्धटेक गणपती दर्शनासाठी जाणा-या भाविकांना व प्रवाशाना  मलठण येथून वेगवेगळया मार्गाने जाणे सोईस्कर पडते. गेल्या अनेक दिवसांपासून येथील राजवाड्याजवळ असणारा हा गावांची  नावे व अंतर दर्शविणारा फलक झाडांच्या आड दडलेल्या अवस्थेत होता. या मार्गाने जाणा-या प्रवाशांची अडचण लक्षात घेत व  या बाबत आमच्या संकेतस्थळ www.shirurtaluka.com या संकेतस्थळावरुन वृत्त प्रसारित करण्यात अाले होते.

या सविस्तर वृत्ताची रस्ते विभागाने तातडीने दखल घेत या फलकाच्या परिसरातील झाडे झुडपे तोडून प्रवाशाना दिसेल अशी त्या परिसरातील स्वच्छता केली आहे. याच परिसरात आणखीन ही स्वच्छता करण्याची गरज प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. तर हा महत्वपूर्ण फलकाला रस्ते विभागाने मोकळा श्वास दिल्या बद्दल कवठ्याचे उपसरपंच अरुण मुंजाळ, दीपक रत्नपारखी,मलठणचे किराण देशमुख,अतुल थोरात, गणेश जामदार यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या