पोलीस अन पञकारांनी लुटला क्रिकेटचा अानंद

रांजणगांव गणपती, ता.१७ मार्च २०१७ (सतीश केदारी) :येथे अायोजित केलेल्या क्रिकेट सामन्यात पञकार व पोलीस यांनी खेळाचा एकच  अानंद लुटला.या रोमहर्षक सामन्यात पोलीस संघाने दणदणीत विजय मिळविला.

रांजणगांव गणपती येथील पोलीस ग्राउंडवर रांजणगांव पोलीस स्टेशन च्या वतीने पोलीस व पञकार यांच्यामध्ये मैञीपुर्ण क्रिकेट सामन्याचे अायोजन करण्यात  अाले होते.या सामन्याचे उद्घाटन  पोलीस निरिक्षक अमर वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात अाले.प्रारंभी टॉस उडविण्यात अाला.यात पञकार संघाने क्षेञक्षणाचा निर्णय घेतला.सुरुवातीपासुनच अाक्रमक खेळी करत पोलीस संघाने अक्षरश:  धावांचा डोंगर उभा केला.तर पञकार संघाने धावांचा पाठलाग करत दमदार खेळी केली परंतु तरी देखिल शेवटच्या ओव्हरमध्ये हार पत्करावी लागली.

या वेळी पोलीस संघाकडुन सहायक पोलीस निरीक्षक सुनिल क्षिरसागर, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत भोसले, राजु मोमीन, अमोल चव्हान, चंद्रकांत काळे, अादींनी उत्कृष्ट खेळी केली तर पञकार संघाकडुन अरुण मोटे, अनिल सोनवणे, पञकार संभाजी गोरडे, पोपट पाचंगे, संपादक सतीश केदारी, अादींनी खेळाचा अानंद लुटला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या