चिमुकल्यांच्या गीतांनी जिंकली उपस्थितांची मने

निमोणे,ता.१८ मार्च २०१७(प्रतिनीधी) : येथील नागेश्वर विद्यालयातील चिमुकल्यांनी लोप पावत चाललेल्या संस्कृती ला गीते अन नाटिकेद्वारे पुन्हा उजाळा दिल्याने उपस्थितांची मने जिंकली.

निमोणे(ता.शिरुर) येथील नागेश्वर विदयालयातील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभ नुकताच पार पडला.या वेळी विविध कार्यक्रमाचे अायोजन करण्यात अाले होते.या प्रसंगी चिमुकल्यांनी विविध नाटिका सादर केल्या.यामध्ये प्लॅस्टिक मुक्ती, लेक वाचवा, अादी नाटिकांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.तर पोता डान्स, डोंबारी डान्स, कृष्ण जन्मला अादी गाण्यांनी डोळ्याचे पारणे फेडले.

या वेळी सरपंच जिजाताई दुर्गे,उपसरपंच गणेश काळे,जितेंद्र काळे, जी.अार. काळे, संतोष काळे,प्रफुल्ल सरोदे,वाघ, शिरगिरे अादींनी मुख्याध्यापक व इतर सहशिक्षक, पञकार बाळासाहेब गायकवाड, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
जय श्रीराम सामाजिक संस्थेचे कोशाध्यक्ष रोहिदास काळे,अशोक गाजरे, अादींनी विशेष परिश्रम घेतले.

डिसेंबर मध्ये घेण्यात अालेल्या विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ देखिल या वेळी पार पडला.महिपती काळे यांच्याकडुन यातील विदयार्थ्यांना रोख बक्षिसे देण्यात अाली.तसेच या वेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपञक देउन गौरविण्यात अाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या