विशेष मुलांसोबत 'माहेर' ची रंगांची उधळण

शिरुर,ता.१७ मार्च २०१७ (प्रतिनीधी) : शिरुर शहरातील अाकांक्षा फौंडेशन च्या विशेष मुलांसोबत माहेर च्या विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण करत रंगपंचमी चा अानंद लुटला.

रंगपंचमी तर सगळेच साजरे करतात.परंतु ज्यांच्या अायुष्यात अद्याप कधीच रंग भरले गेले नाहीत व नेहमीच स्वमग्न असणा-या अाकांक्षा एज्युकेशन फौंडेशन च्या विशेष  विद्यार्थ्यांसोबत माहेर संस्थेतील विद्यार्थ्यांनी एकञ येत रंगांची उधळण केली.या वेळी अाकांक्षा एज्युकेशनल फौंडेशन च्या विद्यार्थ्यांनी देखिल अायुष्यात प्रथमच रंगात न्हाउन जात रंगपंचमी चा अानंद लुटला.या अानंदात अाकांक्षा फौंडेशन च्या संस्थापिका  राणीताई चोरे,माधुरी गरगटे,सायली जंगम,रोहित शाक्य, माहेर संस्थेच्या मीना भागवत, अाकांक्षा संस्थेतील विशेष मुले, माहेर संस्थेतील मुले, पालक अावर्जुन उपस्थित होते.

या वेळी वीस विशेष मुलांच्या अाई असलेल्या अाकांक्षा फौंडेशन च्या संस्थापिका राणीताई चोरे बोलताना म्हणाल्या कि, या संस्थेत वीस विशेष मुलांचा सांभाळ केला जात असुन अशा विद्यार्थ्यांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन नेहमीच वेगळा असतो.त्यामुळे ही मुले प्रेमाला व अानंदाला पारखी असतात.त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या सोबत  अायुष्यात रंगभरणी केल्याने या मुलांना अाजचा वेगळाच दिवस अनुभवायला मिळाला असुन समाजानेही अशा मुलांकडे दुर्लक्ष करु नये असे त्या बोलताना म्हणाल्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या