रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी डॉ. संतोष दुंडे

रांजणगाव गणपती, ता. 21 मार्च 2017: येथील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी डॉ. संतोष दुंडे यांची आज (मंगळवार) निवड झाली.

अष्टविनायक महागणपती मंदिरातील ट्रस्टच्या कार्यालयात मंगळवारी विश्वस्तांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी ऍड. विजयराज दरेकर व सचिवपदी प्रा. नारायण पाचुंदकर यांची निवड करण्यात आली. मुख्य विश्वस्तपदी राजेंद्र देव व खजिनदारपदी शेखर देव यांना पूर्वीच्याच पदावर कायम ठेवण्यात आल्याचे अध्यक्ष डॉ. दुंडे यांनी सांगितले.

दरम्यान, निवडीनंतर अध्यक्ष व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार करण्यात आला. निवडीनंतर सर्व उपस्थित विश्वस्तांनी व पदाधिकाऱ्यांनी महागणपतीचे दर्शन घेतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या