...त्यांची अशीही सामाजिक बांधिलकी

शिरुर,ता.२४ मार्च २०१७(सतीश केदारी) : येथील खुशालचंद बोरा सेवा प्रतिष्ठाण च्या वतीने शिरुर, पारनेर व जिल्हयातील विविध गोशाळांना मोफत कडबा पेंढ्या व कोबी खाद्य देण्यात अाले असुन त्यांच्या या सामजिक बांधिलकी जपत राबविलेल्या उपक्रमाचे परिसरात कौतुक  होत  अाहे.

शिरुर शहरात सामाजिक क्षेञात भरीव योगदान देणा-या खुशालचंद बोरा सेवा प्रतिष्ठाण ने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक बांधिलकी जपत पद्ममणी जैन तिर्थ पेढी गोशाळा पाबळ या ठिकाणी  एक ट्रक,गोरक्षण पांजरपोळ शिरुर येथे ३ ट्रॅक्टर,शांजापुर येथील माउली कृपा गोशाळेस एक टेंपो, गरीबांसाठी १०० किलो कोबी वाटप केले असल्याचे शिरिषकुमार बोरा व खुशालचंद बोरा यांनी सांगितले.

तसेच पद्ममणी जैन तिर्थ पेढी गोशाळा पाबळ येथे एक ट्रॅक्टर मध्ये सुमारे ३७५ कडबा,गोरक्षण पांजरपोळ शिरुर येथे ३७५ कडबा पेंढी,क्षेञपाल प्रतिष्ठाण लोणीकंद येथे एक टेम्पोत सुमारे ४०० पेंढी, संत निळोबाराय गोशाळा पिंपळनेर मध्ये एक टेम्पो, सासवड येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेस एक टेम्पोत ४०० कडबा मोफत व स्वखर्चाने देण्यात अाल्याचे सेवा प्रतिष्ठाण चे खुशालचंद बोरा यांनी सांगितले.

या वेळी बोलताना ते म्हणाले कि, हा उपक्रम नियमित राबवत असुन काहि दिवसांपासुन देखिल खाद्य म्हणुन जिल्हयातील गोशाळांना बटाटे वाटप मोठ्या प्रमाणावर केले होते.या उन्हाळ्यात गोशाळांना खाद्याचा तुटवडा भासु नये म्हणुन अशा संस्थांना सामाजिक बांधिलकी म्हणुन मोठ्या प्रमाणावर चारा वाटप केले अाहे.

खुशालचंद बोरा सेवा प्रतिष्ठाण ने सामाजिक बांधिलकी जपत कुठलाही गवगवा न करता समाजाप्रती ठेवलेल्या निष्ठेचे मोठे कौतुक होत असुन समाजाने ही पुढे येण्याची गरज अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या