भांबर्डे येथे कृषी पर्यटन केंद्रास आग

भांबर्डे,ता.११ एप्रिल २०१७(प्रतिनीधी) : येथील करण कृषी पर्यटन केंद्रास सोमवारी दुपारी लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले असुन कुठलीही जिवित हाणी झाली नसल्याचे सुञांकडुन समजते.

भांबर्डे(ता.शिरुर) येथील करण कृषी पर्यटन केंद्र हे पर्यटन केंद्र म्हणुन प्रसिद्ध अाहे.सोमवारी दुपारी लागलेल्या आगीत या केंद्रातील विविध वस्तू व बहुतांश झाडे जळून खाक झाली.त्याचप्रमाने दुपारच्या सुमारास स्वयंपाक घरातील दोन गॅसच्या टाक्‍यांचा स्फोट झाल्याने आगीची तीव्रता अधिकच वाढली. तसेच केंद्रातील 10 तंबू, जनरेटर, 2 पाण्याच्या मोटारी, फ्रिज व इतर अनेक वस्तू जळाल्या.

आग लागल्याचे समजताच रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस उपनिरीक्षक महादेव पाटील, गणेश सुतार, एस. डी. कोळेकर, माणिक काळकुटे, रांजणगाव एमआयडीसीतील अग्निशमन दलाचे अधिकारी यशवंत नलावडे यांनी घटनास्थळावर येऊन आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्‍यात आणण्यासाठी अग्निशामक दल, पोलिस व ग्रामस्थांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.या प्रकरणी मंडल अधिकारी गिरी गोसावी व ग्रामसेवक संतोष गायकवाड यांनी पंचनामा केला अाहे.

तर सरपंच लक्ष्मी रासकर, माजी सरपंच गोरख म्हस्के, अरुण तिरखुंडे, स्वप्नील वीर, ज्ञानेश्वर पवार, रवी बत्ते, सुनील वीर, दीपक वीर, पोलिस पाटील मुकुंद पवार आदींसह गावातील युवक व ग्रामस्थांनी आग आटोक्‍यात आणण्यासाठी सहकार्य केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या