चिंचोलीत मोरांनाही सोसाव्या लागताहेत उन्हाळाच्या झळा
मोराची चिंचोली, ता.११ एप्रिल २०१७ (सतीश केदारी) : दिवसेंदिवस उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत असतानाच मोरांना देखिल दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याचे चिञ पहावयास मिळते अाहे.
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणुन नावाजलेले मोराची चिंचोली हे गांव ख-या अर्थाने मोरांच्या वास्तव्याचे गांव म्हणुन प्रसिद्ध अाहे. या गांवात ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पुर्वी पासुनच या गावांत मोरांचे वास्तव्य अाहे. अनेक मोर हे लहान थोरांशी अगदी एकरुप झालेले अाहे. एकुण या गांवात सुमारे अडीच ते तीन हजार मोरांची संख्या अाहे. त्यामुळेच की काय गावांला मोरांची चिंचोली हे नांव पडले अाहे.
परंतु अलिकडल्या काळात या मोरांची संख्या वनविभाग व शासनाच्या उदासिनतेमुळे घटत चालली अाहे. दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान व पाण्याचे परिसरात जाणवणारे दुर्भिक्ष यामुळे बहुतांश पक्षांनी स्थलांतर केले असुन उर्वरित पक्षांना पाण्यासाठी दाहिदिशा वनवन भटकावे लागत असल्याचे चिञ या ठिकाणी पहावयास मिळते.
याबाबत येथील ग्रामस्थांशी संपर्क साधला असता, ग्रामस्थांनी या राष्ट्रीय प्राण्याबद्दल असलेले प्रेम व्यक्त करत सरकारच्या उदासिनतेबाबत नाराजी व्यक्त केली अाहे. सुमारे अडीच हजारांच्या अासपास संख्या असलेले पक्षी अाता माञ निम्म्यापेक्षा ही कमी असल्याचे जाणवते.
या भागात थेट पाहणी केली असता, पाणी टंचाई ची भिषण समस्या जानवत असुन त्याचा फटका या पक्षाला बसतो अाहे. पाण्याअभावी अनेक पक्षाला उष्माघाताला देखिल सामोरे जावे लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. सरकारने याबाबत लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली अाहे.