महाराष्ट्रदिन व कामगार दिन उत्साहात साजरा

शिरुर, ता.१ मे२०१७ (प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात महाराष्ट्रदिन व कामगार दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात अाला.

तहसिल कार्यालय येथे तालुक्याचे अामदार बाबुराव पाचर्णे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात अाले.यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. येथीलच जीवन विकास मंदीर येथे ध्वजारोहन करुन महाराष्ट्रदिन साजरा करण्यात अाला.प्रारंभी ध्वजस्तंभाची मान्यवरांच्या हस्ते पुजा करण्यात अाली त्यानंतर  संस्थेच्या विश्वस्त शकुंतला रसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात अाले.या वेळी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र धनक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी कामगार दिनाचे महत्व व महाराष्ट्रदिनाचे उपस्थितांना महत्त्व पटवुन दिले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप शिंदे, डॉ.गवारी, तसेच पर्यवेक्षक,शिक्षक व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन अजय सोनवणे यांनी केले. एक मे च्या दिवशी संस्थेतील उत्तीर्णविद्यार्थ्यांना  निकालाचे देखिल वाटप करण्यात अाले.

रामलिंग रोड  येथील अाकांक्षा एज्युकेनल फौंडेशन या विशेष शाळेचे ध्वजारोहन संस्थेचे विश्वस्त मनसुख गुगळे यांच्या उपस्थितीत करण्यात अाले.या वेळी अाकांक्षा एज्युकेशनल फौंडेशन च्या संस्थापिका राणीताई चोरे, डॉ.मनिषा चोरे, दिपक घोडे, संस्थेचे कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते. त्याचप्रमाणे गावोगावी उत्साहात ध्वजवंदन करण्यात अाले.अनेक ठिकाणी ग्रामसभा देखिल घेण्यात अाल्या.

महाराष्ट्रदिन व कामगार दिनाचे अौचित्य साधुन शिरुर नगरपालिकेत मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्या उपस्थितीत कामगारांना गुलाबपुष्प व मिठाई वाटप करण्यात अाले.या वेळी नगराध्यक्षा, नगरसेविका संगीता मल्लाव व नगरसेवक उपस्थित होते.कारेगांव, रांजणगांव, सणसवाडी,कोरेगांव अादी ठिकाणी विविध कंपन्यांनी देखिल कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे अायोजन केले होते.सर्वञ उत्साहाचे वातावरण पहायला मिळत होते.न्हावरे येथे भाजयुमोच्या पदाधिका-यांनी सफाईकामगारांचा श्रीफळ व पुष्प देउन सत्कार केला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या