बाजारसमिती निवडणुकित ४१ उमेदवार रिंगणात

शिरुर, ता.३ मे २०१७ (सतीश केदारी) : शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी १९ जागांपैकी  दोन जागा बिनविरोध निवडुन आल्याने १७ जागांसाठी उमेदवार सुमारे ४१ उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले अाहेत.

शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी काल (ता.२) रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता.त्यामुळे  भाजप व राष्ट्रवादीच्या दोन ही पक्षांच्या नेत्यांना उमेदवारांच्या माघारी घेण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे चिञ पहावयास  मिळत होते.

माघार घेण्याच्या अंतिम टप्प्यात अनेक दिग्गजांनी माघार घेतली.या वेळी कृषी व पणन मतदार संघातुन राष्ट्रवादीचे हनुमंत सासवडे  तर ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातुन तृप्ती संतोष भरणे या बिनविरोध निवडुन अाल्या अाहेत.बाजार समितीच्या निवडणुकिसाठी राष्ट्रवादी व भाजप अशा दोनही पक्षांनी दमदार पॅनेल उभे करत एकमेकांसमोर खडे आव्हाण निर्माण केले आहे.बिनविरोध निवडणुन अालेल्या उमेदवारांचा सत्कार दोन्ही पक्षांकडुन करण्यात अाला. 

भाजप च्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे :

कृषी पतसंस्था मतदार संघ(सर्वसाधारण)
अॅड.देवराम धुमाळ, राहुल गवारे,अानंदराव हरगुडे, अशोक माशेरे, तात्यासाहेब सोनवणे, गणेश मचाले, संतोष मोरे,

कृषी पतसंस्था मतदार संघ(महिला)-छाया अप्पासाहेब बेनके,सुजाता गाजरे,
कृषी पतसंस्था मतदार संघ(इतर मागास)-विकास शिवले
कृषी पतसंस्था मतदार संघ(भटक्या विमुक्त जाती/जमाती)- डॉ.हेमंत पवार
ग्रामपंचात मतदार संघ(सर्वसाधारण)-अनिल नवले, संभाजी कर्डिले
ग्रामपंचात मतदार संघ(अनुसुचित जाती/जमाती)- तुकाराम थोरात
हमाल व तोलार मतदार संघ-कुंडलिक दसगुडे

राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी
कृषी पतसंस्था मतदार संघ(सर्वसाधारण)-शशिकांत दसगुडे,विश्वास ढमढेरे, अॅड.वसंतराव कोरेकर, शिवाजी वडघुले, बाबाजी निचित, शंकर जांभळकर,प्रकाश पवार,
ग्रामपंचात मतदार संघ(सर्वसाधारण)-मानसिंग पाचुंदकर, धैर्यशिल मांढरे,
ग्रामपंचात मतदार संघ(अनुसुचित जाती/जमाती)- विजेंद्र गद्रे
कृषी पतसंस्था मतदार संघ(महिला)-मंदाकिनी पवार,कौशल्या भोर
कृषी पतसंस्था मतदार संघ(इतर मागास)-अनिल भुजबळ
कृषी पतसंस्था मतदार संघ(भटक्या विमुक्त जाती/जमाती)-सतीश कोळपे
कृषी व पणन प्रक्रिया मतदार संघ-हनुमंत सासवडे(बिनविरोध)

राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी तालुकाध्यक्ष रविंद्र काळे यांनी जाहिर केली तर भाजप च्या उमेदवारांची अंतिम यादी भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान शेळके यांनी जाहिर केली.या वेळी अशोक पवार यांनी भुमिका  स्पष्ट करताना विकासाच्या मुद्दयावरच निवडणुक लढविली जाणार असुन शेतकरी विकास हेच प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.तर दादा पाटील फराटे व भगवान शेळके यांनी सक्षम पॅनेल उभा केला असल्याचे सांगत विरोधकांना चांगले अाव्हाण निर्माण केले असल्याचे सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या