जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

पाबळ, ता.१० मे २०१७ (विशेष प्रतिनीधी) : पती कंपनीत कामाला गेलेले असताना एका इसमाने रात्रीच्या सुमारास घरात घुसून त्या महिलेच्या लहान मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला असून महिलेला देखील ठार मारण्याची धमकी दिली असल्याची घटना नुकतीच घडली आहे.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती कंपनीत नोकरीला असून त्या महिलेचे पती कंपनीत कामावर गेलेले होते. तर तिची सासू व एक मुलगी चार ते पाच दिवसांपूर्वी नातेवाईकांच्या लग्नासाठी बाहेरगावी गेलेले होते. त्यामुळे सदर महिला हि शनिवार दिनांक ६ मे रोजी रात्रीच्या सुमारास जेवण करून घरातील आवराआवर केली त्यानंतर तिचे सासरे घराचे पुढील दारात झोपले होते तर मुलगा दिवानवर झोपलेला होता यावेळी महिलेने बाथरूम मध्ये जाऊन हिटर बंद करून बेडरूम मध्ये आली असताना तिने बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला. यावेळी त्या महिलेला कोणीतरी पाठीमागून बेडवर पाडले. आणि यावेळी त्या महिलेला तू जर ओरडली तर तुझ्या मुलाला ठार मारून टाकीन असा दम दिला आणि जबरदस्तीने सदर महिलेवर बलात्कार केला.

यावेळी महिलेने घाबरून उठून लाईट चालू केली असता त्या ठिकाणी अमोल लक्ष्मण पोखरकर हि व्यक्ती असल्याचे पिडीत महिलेच्या निदर्शनास आले.यावेळी अमोल पोखरकर याने कोणास काही सांगितले तर तुला देखील ठार मारील अशी धमकी दिली व पळून गेला. यांनतर घडलेला सर्व प्रकार पिडीत महिलेने तिचे पती व इतर नातेवाइकांना सांगितला या बाबत सदर महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून शिक्रापूर पोलिसांनी अमोल लक्ष्मण पोखरकर रा. लोणी धामणी ता. आंबेगाव जि. पुणे याचे गुन्हा दाखल केला असून शिक्रापूर पोलिसांनी अमोल लक्ष्मण पोखरकर यास अटक करत शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ११ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले व गणेश वारुळे हे करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या