शिरूरमध्ये आजारपणाला कंटाळून एकाची आत्महत्या

शिरूर, ता.१२ मे २०१७ (प्रतिनीधी) : आजारपणाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. सुखदेव धोंडीबा जाधव (वय 56, रा. जोशीवाडी, शिरूर) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सुखदेव जाधव हे राजेंद्र बोऱ्हुडे यांचे मेहुणे आहेत. ते दोघे जोशीवाडी येथे शेजारी राहतात. जाधव यांनी राहत्या घरातील छताच्या लाकडी वाशाला गळफास घेतल्याची माहिती त्यांची मुलगी दीपाली अमोल चव्हाण यांनी बोऱ्हुडे यांना पहाटे चार वाजता मोबाईलवरून दिली. बोऱ्हुडे यांनी तातडीने त्यांच्या घरी जाऊन स्थानिकांच्या मदतीने त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेतून खाली उतरविले व सरकारी दवाखान्यात नेले.डॉक्‍टरांनी तपासणीपूर्वीच ते मृत झाल्याचे सांगितले.

या प्रकरणी राजेंद्र लक्ष्मण बोऱ्हुडे (रा. जोशीवाडी, शिरूर) यांनी याबाबतची खबर पोलिसांना दिली. जाधव हे सततच्या आजारपणाला कंटाळले होते, अशी माहिती बोऱ्हुडे यांनी पोलिसांना दिली.या घटनेचा तपास पोलिस नाईक एस. डी. जाधव हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या