महिला क्षेत्रामधून दिपाली शेळके यांची 'फेव्हरेट'साठी निवड!

शिरूर, ता. 13 मे 2017 (सतीश केदारी)- शिरूर तालुक्याचा  'फेव्हरेट' कोण? साठी महिला क्षेत्रामधून पंचायत समितीच्या माजी सदस्या दिपाली शेळके यांच्या बाजूने नेटिझन्सनी कौल दिला आहे. यामुळे सौ. शेळके यांनी पुढील मतचाचणी फेरीत प्रवेश केला आहे.

www.shirurtaluka.com या संकेतस्थळावर 08 मे ते 11 मे 2017 या कालावधीमध्ये मतचाचणी घेण्यात आली होती. नेटिझन्सनी सौ. शेळके यांना पसंती दर्शवत त्यांच्या बाजूने मतदान केले. सौ. शेळके यांना 90 टक्के त्यांना मते मिळाल्यामुळे महिला क्षेत्रामधून त्यांची निवड झाली आहे.

संकेतस्थळावर घेण्यात आलेली मतचाचणी पुढीलप्रमाणे-
महिला क्षेत्रांमधील खालील मान्यवरांपैकी आपण 'फेव्हरेट' म्हणून कोणाची निवड कराल?
1) दिपाली शेळके
2) राणी कर्डिले
3) शोभना पाचंगे
4) संगिता मल्लाव
5) मनिषा सोनवणे

कोणाचा ना विजय ना पराजय...
सोशल नेटवर्किंग हे पुर्णपणे वेगळे विश्व आहे. नेटिझन्सनीच निवड केलेल्या मान्यवरांची नावे मतचाचणीमध्ये घेण्यात आली आहे. एक वेगळा उपक्रम असल्यामुळे ज्या मान्यवराला सर्वाधिक मते मिळतीच तो उमेदवार पुढील मत फेरीमध्ये जाणार आहे. परंतु, इतर चार उमेदवारांचेही काम मोठे असल्यामुळे त्यांची निवड मतचाचणीसाठी झाली आहे. त्यांच्या कामाला आमचा सलामच. परंतु, आपल्यापैकीच एका मान्यवराला सर्वाधिक मते मिळाल्यामुळे आपला पराजय असे समजण्याचे मुळीच कारण नाही. नेटिझन्सनी तुमची निवड केली असल्यामुळेच पाच मध्ये निवड झाली, यावेळीच तुम्ही खऱया अर्थाने विजयी झाला असून, तुमच्या कार्याला नेटिझन्सनी सलाम केला आहे. तुमच्यावरील त्यांचे प्रेम निवडीमधूनच दिसून आवे आहे. यामुळे ही मतचाचणी म्हणजे कोणाचा ना विजय ना पराजय आहे. लोकशाही प्रमाणे मतदान असल्यामुळे आपल्यापैकीच कोण तरी पुढे जाणार आहे.

संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन मतचाचणी घेऊन 'शिरूरचा फेव्हरेट' निवडला जाणार आहे. विविध क्षेत्रांमधील 45 उमेदवारांमधून एका उमेदवाराची निवड होणार आहे. याचाच अर्थ 44 उमेदवारांचे त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात काम कमी आहे, असे मुळीच सजण्याचे कारण नाही. किंवा संकेतस्थळाचा कोणाला कमी लेखण्याचा उद्देश आहे, असे मुळीच समजू नये, असे कोणाला वाटत असेल तर प्रथम आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु, गाव, तालुका, जिल्हा, राज्यासह जगभरातील नेटिझन्सनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. यामुळे संकेतस्थळाच्या वतीने सर्वांचे मनपुर्वक धन्यवाद!

दरम्यान, विविध क्षेत्रांमधील मतचाचण्या पुर्ण झाल्यानंतर प्रत्येक क्षेत्रामधून एका मान्यवर पुढे जाणार आहे. शेवटच्या मतचाचणी 22 मे 2017 पर्यंत चालणार आहे. यानंतर शिरूरचा 'फेव्हरेट' ठरणार आहे. या शिरूरच्या 'फेव्हरेट'ला मान्यवर व्यक्तीच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

'फेक' ईमेल आयडी टाळा-
www.shirurtaluka.com या संकेतस्थळावर अनेकजण मत नोंदविताना चुकीच्या (फेक) ई-मेल आयडीचा वापर करताना दिसतात. परंतु, मत नोंदविल्यानंतरही खरा ई-मेल असलेलेच मत नोंदविले जाते. हे सर्व तांत्रिक असल्यामुळे फेक ई-मेल आयडी टाळून खरा ई-मेलचा वापर करावा. यामुळे आपले मत खऱया अर्थाने आपल्या मनातील उमेदवाराच्या नावावर नोंदविले जाईल.

पुढील मतचाचणी पत्रकार क्षेत्रासाठी
मतनोदंविण्यासाठी कालावधी 13/05/2017 ते 16/05/2017 पर्यंत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या