जांबुत ला अल्पवयीन बालिकेवर अत्याचार

जांबुत,ता.२४ मे २०१७ (प्रतिनीधी) : जांबुत (ता.शिरुर) येथे दहा वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांबुत(ता.शिरुर) येथिल शिस्तारवस्ती येथे पिडीत मुलगी, तिचा भाऊ  वडिल हे (ता.२३) रोजी घराबाहेर झोपले होते. राञी १० वाजल्यानंतर शेतीपंपाची वीज आल्याने मुलीचे वडिल पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेले असता सदर मुलीला अज्ञात इसमाने उचलून नेऊन बलात्कार केला व जर ही माहीती कोणाला सांगितली तर त्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली.त्यानंतर पीडीत मुलीने ही घटना आपल्या आईला सांगितली.

या संदर्भात पिडित मुलीच्या आईने शिरुर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस शिरुर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपनिरीक्षक युसुफ इनामदार हे करीत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या