'शिरूर तालुका डॉट कॉम'चे सातव्या वर्षात यशस्वी पदार्पन

शिरूर, ता. 26 मे 2017- संपूर्ण राज्यात एखाद्या तालुक्याचे संकेतस्थळ निर्मितीचा मान मिळविलेल्या शिरूर तालुक्याच्या www.shirurtaluka.comने आज (शुक्रवार) सातव्या वर्षात पदार्पन केले आहे. वाचक, जाहिरातदार व हितचिंतकांकडून मिळत असलेल्या प्रेमामुळे संकेतस्थळाची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे.

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते 26 मे 2011 रोजी विधान भवन येथे या संकेतस्थळाचे उद्‌घाटन झाले आहे.

गेल्या सहा वर्षात संकेतस्थळाने विविध उपक्रम राबविले आहेत. शिवाय, आमच्या बातमीदारांनी दिलेल्या बातम्यांमुळे अनेक विषय मार्गी लागले आहेत. अर्थात, याला जोड आहे ती वाचक, जाहिरातदार व हितचिंतकांची. संकेतस्थळाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे यशाचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या सहा वर्षात अविरतपणे संकेतस्थळाची वाटचाल सुरू आहे. बेधडक, अचूक व निपक्षीपातीपणे बातम्या व इतरत्र माहिती संकेतस्थळावर मिळत आहेत. यामुळे तालुका, जिल्हा, राज्य व विविध देशांमधील मराठी वाचक संकेतस्थळाशी जोडले गेले आहेत. संकेतस्थळाच्या यशामध्ये अनेकांचा मोलाचा वाटा आहे, हे मोल कशामध्येही न मोजता येणारे आहे.

शिरूर तालुक्यातील प्रत्येक युवकाच्या हातात मोबाईल आला आहे. वाड्या-वस्त्या व तालुक्याबाहेरील वाचक सर्वप्रथम संकेतस्थळावरून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. विविध वाचकांनी प्रतिक्रया व इमेलच्या माध्यमातून तसे आम्हाला कळविले आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात संकेतस्थळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. यामुळेच संकेतस्थळाच्या माध्यमातून Video उपलब्ध करून दिले जात आहेत. या व्हिडिओंना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सर्वांनाच दिसत आहे.

संकेतस्थळाचे फेसबुकवरील 22 हजार लाईक्स, 750 Whatsaap Group आहेत. यामुळे कोणतीही माहिती कोणत्याही वेळी एका सेंकदात तालुक्यासह जगभर पोहचत आहे. यामुळे सर्वच वाचकांची पसंती www.shirurtaluka.com आहे. वाचकांच्या प्रेमापोटीच यशाचा टप्पा दिवसेंदिवस पार केला जात आहे. यापुढेही आम्ही सडेतोड व बिनचूक बातम्या देण्यासाठी कटीबद्ध राहणार आहोत, यासाठी गरज आहे ती तुमच्या प्रेमाची.

खालील प्रतिक्रयांच्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा नक्की कळवा अथवा शुभेच्छांचा व्हिडिओ तयार आमच्या मेलवर पाठवा तो फेसबुक व संकेतस्थळाच्या माध्ममातून शेअर केला जाईल.

दरम्यान, संकेतस्थळाबाबत आपल्या काही सुचना असल्यास shirurtaluka@gmail.com वर नक्की पाठवा.
धन्यवाद!!!!
- टीम शिरूर तालुका डॉट कॉम.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या