www.shirurtaluka.com चा वर्धापदिन उत्साहात साजरा

शिरुर,ता.२९ मे २०१७(तेजस फडके) : राज्यातले तालुक्याचे प्रथम संकेतस्थळ असलेल्या 'शिरुर तालुका डॉट कॉम' चा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पुणे जिल्हयात सर्वाधिक  वाचक संख्या असलेली शिरुर तालुक्यात नावाजलेले संकेतस्थळ www.shirurtaluka.com ला नुकतेच सहा वर्षे पुर्ण झाली.त्यानिमित्त केक कापुन संकेतस्थळाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

संकेतस्थळाचे कायदेशीर सल्लागारअॅड.विकास कुटे यांनी संकेतस्थळाविषयी बोलताना सांगितले कि, प्रत्येक हा कामात दिवसेंदिवस व्यस्त असल्याने प्रत्यक्षात पेपर वाचायला देखिल वेळ नसतो.संकेतस्थळाच्या प्रत्येक घडामोडी तत्काळ व वस्तुनिष्ठ माहितीसह मिळत असल्याने अधिकाधिक लोकप्रिय आहे.

तर आकांक्षा एज्युकेशन फौंडेशन च्या राणीताई चोरे यांनी संकेतस्थळ हे केवळ बातम्या देत नसुन सामाजिक बांधिलकी जपत नेहमी विविध उपक्रम राबवत असुन समाजातील प्रत्येक घटकाला फायदेशीर ठरत आहे.समाजाने देखिल साथ द्यावी असे आवाहन या वेळी केले.

सहयोगी संपादक तेजस फडके यांनी गेल्या सहा वर्षाचा आढावा घेत वेळोवेळी आयजिलेल्या उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली.भविष्यात देखिल असेच विधायक उपक्रम राबवत समाजाप्रती निष्ठा कायम ठेवणार असल्याचे सांगितले.

संकेतस्थळाचे कार्यकारी संपादक सतीश केदारी या वेळी बोलताना म्हणाले कि, समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना ठेवल्यानेच सहावर्षे यशस्वी रित्या पुर्ण करण्यात आली असुन या साठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनेकांनी हातभार लावला आहे.भविष्यात देखिल विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले व मदत करणा-या सर्वांचे आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या