शिंदोडी ग्रामपंचायतीत निधीचा मोठा अपहार (Video)

शिंदोडी, ता. 29 मे 2017 (तेजस फडके): येथील ग्रामपंचायतमध्ये २०१० ते २०१५ मध्ये गावच्या विकासासाठी आलेल्या निधीचा ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचा आरोप येथील माहिती अधिकार कार्यकर्ते रामकृष्ण गायकवाड यांनी www.shirurtaluka.comशी बोलताना केला आहे.संकेतस्थळाने Coffee With www.shirurtaluka.com असा नव्याने उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमादरम्यान गायकवाड यांनी संकेतस्थळाशी सविस्तर माहिती दिली.

माहिती अधिकार कार्यकर्ते रामकृष्ण गायकवाड हे शिंदोडीचे रहिवासी आहेत. शिंदोडी ग्रामपंचायतमध्ये सन २०१० ते २०१५ पर्यंत ग्रामपंचायत मध्ये विविध शासकीय फंडातून किती निधी आला व तो कुठे खर्च झाला याबाबतची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत त्यांनी माहिती मागवली होती. याबाबती माहिती देताना संबधित ग्रामसेवकाने सुरवातीला टाळाटाळ केली. परंतु, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर ती माहिती मुदत उलटुन देण्यात आली. त्या माहितीमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या तसेच जी माहिती मागवली ती दिलीच नसल्याचे लक्षात आले. यानंतर अपिलीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर संबधित विस्तार अधिकारी श्री. शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली आहे. सुनावणीचा निकाल येणे अजुन बाकी आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

गटविकास अधिकारी संदीप जठार यांची वेळोवेळी भेट घेऊन ग्रामपंचायतीच्या अपहाराबाबत माहिती दिली असूनही राजकीय दबावापोटी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी संबधित ग्रामसेवकास पाठीशी घालत आहेत, असा आरोप गायकवाड यांनी www.shirurtaluka.comशी बोलताना केला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या