पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार-घायतडक (Video)

करडे, ता. २९ मे २०१७ (सतीश केदारी) : भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवत थेट जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिल्याने या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही, असे भाजपा विद्यार्थी आघाडीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विशाल घायतडक यांनी www.shirurtaluka.comशी  बोलताना सांगितले. भाजपा विद्यार्थी आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी करडे (ता.शिरुर) येथील विशाल घायतडक यांची नुकतीच निवड करण्यात आली.भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रविजी अनासपुरे यांच्या हस्ते त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. युवा मोर्चा चे पुणे जिल्हाध्यक्ष सुदर्शनभाऊ चौधरी यांनी त्यांची नेमणुक केली आहे. पुणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात भाजपा प.महाराष्ट्र संघटन मंत्री रविजी अनासपुरे यांच्या हस्ते तसेच भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस सचिन सदावर्ते, अमोल जाधव, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रियंका मेदनकर, भाजयुमो पुणे जिल्हाध्यक्ष सुदर्शनभाऊ चौधरी, भाजयुमो कार्याध्यक्ष सतिष पाचंगे, भाजयुमो पुणे जि.सरचिटणीस नवनाथजी पारखी, नितिन फाकटकर तसेच भाजयुमो पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व पुणे जिल्ह्यातील सर्व भाजयुमो तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व मान्यवर यांच्या उपस्थितीत नियुक्तीचे पत्र देऊन पक्षविस्तारासाठी व जनसेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. भाजपा विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर श्री.विशालजी घायतडक यांचा पुणे जिल्हा भाजयुमोच्या वतीने सन्मान करण्यात आला.

निवडीनंतर संकेतस्थळ शिरुर तालुका डॉट कॉम शी बोलताना त्यांनी सांगितले की, राजकारणात दिवसेंदिवस घराणेशाही दिसत असताना भारतीय जनता  पार्टीने माझ्यावर कुठलाही राजकीय  वारसा नसताना मोठा विश्वास दाखवत जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. या दिलेल्या संधी ने समाजात एकप्रकारे चांगला संदेश जात आहे. भारतीय  जनता  पार्टी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देत आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, 'शिरुर हवेलीचे लोकप्रिय आमदार बाबुराव पाचर्णे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष  सुदर्शन चौधरी, यांनी जो माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखविला आहे. त्या विश्वासास पाञ ठरत जिल्हयातील सुमारे १३ तालुक्यांत पक्षाच्या माध्यमातून विदयार्थी व उद्याचा समाज  घडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याचप्रमाणे, भविष्यकालीन विविध उपक्रमाची आखणी केली असून त्यानुसार अडीअडचणीतील विद्यार्थ्यांना भरिव मदत  व प्रश्न मार्गी लावण्याचा संकल्प केला आहे.'

विशाल घायतडक हे करडे  ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. शिवाय, पी.टी.पी.एल.चे संघमालक आहेत. गावपातळीवर यापुर्वी विदयार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. ग्रामपंचायतच्या माध्यमातुन विविध दर्जेदार विकासकामे केली आहेत. गरजूंना न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या निवडीनंतर शिरुर तालुक्यात अनेकांनी आनंद व्यक्त केला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या