तांदळी ग्रामपंचायतीत पैरवनाथ पॅनेल विजयी

मांडवगण फराटा,ता.३१ मे २०१७ (प्रतिनीधी) : तांदळी (ता.शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामदैवत भैरवनाथ महाराज पॅनेलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला.

जिल्हा परिषदेच्या कृषी व पशूसंवर्धन विभागाचे माजी सभापती बबनराव गदादे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे, माजी पंचायत समिती सदस्य मच्छींद्र गदादे, गोरक्ष खोरे, श्यामराव खोरे, मेजर नलगे यांच्या नेतृत्वाखालील श्री. ग्रामदैवत भैरवनाथ महाराज पॅनेलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला.त्यांनी  ११ पैकी दहा जागा जिंकून ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले.विरोधी  भैरवनाथ महाराज ग्रामविकास पॅनेलचा फक्त १ उमेदवार निवडून आला.
येथील ग्रामपंचायतीचे सरपंच पद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. विजयी उमेदवार पुढील प्रमाणे- श्री. ग्रामदैवत भैरवनाथ महाराज पॅनेल - वॉर्ड क्रमांक १ - गोरख गणपत गदादे, संगीता मोहन गदादे, शंकर बापू गदादे. वॉर्ड क्रमांक 2 - कमल दत्तात्रेय नलगे, राजेंद्र सदाशिव कळसकर. वॉर्ड क्रमांक 3 - स्मिता सुरेश गदादे, सुवर्णा संदिप कळसकर, विजय गोकुळ कळसकर. वॉर्ड क्रमांक 4 - आशाबाई दत्तात्रेय साबळे, चांगुणाबाई दत्तात्रेय गदादे.
श्री. भैरवनाथ महाराज ग्रामविकास पॅनेल - वॉर्ड क्रमांक 4 - दत्तात्रेय ज्ञानदेव खोरे

निवडणूक निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. गावात येताच विजयी ऊमेदवारांनी ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेतले. त्यांची गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या