शिरूरमध्ये शेतकरी संपाला वाढता पाठिंबा

शिरूर,ता.३१ मे २०१७(प्रतिनीधी) : "किसान क्रांती' संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात सहभागाचा निर्णय शिरूर तालुक्‍यातील विविध संस्था संघटनांनी घेतला असुन  सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होऊन संप यशस्वी करावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.

शिरुर तालुक्यातील आमदाबाद ग्रामपंचायतीने शेतकरी कर्जमाफीसाठी ठराव केला असून, तहसीलदारांना याबाबत निवेदन दिले आहे. किसान क्रांती शेतकरी कृती समितीनेही तहसीलदार राजेंद्र पोळ यांच्यामार्फत थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले असून, एक जूनपासूनच्या संपात शिरूर तालुक्‍यातील सर्व शेतकरी सहभागी होणार असल्याचे कळविले आहे. गेल्या तीन वर्षांतील दुष्काळी स्थिती, कोणत्याही शेतीमालाला न मिळालेला भाव, यामुळे वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्या यावर कर्जमाफी हाच एकमेव उपाय असून, शासनाने त्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी कृती समितीचे संघटक नितीन थोरात यांनी केली. त्यांच्यासह आमदाबादचे सरपंच योगेश थोरात, आमदाबाद सोसायटीचे अध्यक्ष अशोक माशेरे, लक्ष्मण पवार, आबासाहेब जाधव, सचिन थोरात, बी. आर. माशेरे यांनी याबाबतचे निवेदन  तहसीलदारांना दिले आहे.

सोशल मिडियावर देखिल जागृती करण्यात येत असुन तालुक्यातील अनेक संघटना देखिल या आंदोलनात उतरत आहेत.गावोगावी बैठका घेण्यात येत असुन संपात उतरण्याचे आव्हान करण्यात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या