अखेर 'ती' उत्तीर्ण झाली पण...

पिंपळसुटी,ता.३१ मे २०१७(सतीश केदारी) : बारावीत नापास होण्याच्या भीतीने जीवन संपविलेल्या 'त्या' विद्यार्थीनीला बारावीत चांगले मार्क्स मिळाले आहेत.

शिरुर तालुक्यातील पिंपळसुटी(ता.शिरुर) येथील प्रियंका चंद्रकांत पोखरकर (वय-१८) हीने शुक्रवार (दि. १९) रोजी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेउन जीवन संपविले होते. प्रियंका ही शिरूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये १२ वी वाणिज्य या वर्गात शिकत होती. मार्च महिन्यात तिने १२ वी ची परीक्षा दिली होती.स्वभावाने अतिशय शांत असलेल्या प्रियंका परिक्षेनंतर तणावात वावरत होती.दरम्यान तीने गळफास घेउन आपली जीवनयाञा संपविली होती. त्यानंतर  जाहीर झालेल्या निकालात सुमारे ६३ % टक्के गुण मिळवत ती परिक्षेत उत्तीर्ण झाली असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.प्रियंकाच्या निधनाने या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रियंका जरी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली असली तरी जीवनाच्या परीक्षेत माञ अपयशी ठरली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या