सरकारमधील काही लोकांकडून शेतक-यांची क्रुर चेष्ठा (Video)

रांजणगाव गणपती, ता.१ जुन २०१७ (तेजस फडके) : सरकारमधील जबाबदार लोकप्रतिनीधी शेतक-यांसाठी काही चांगली कामे करत असताना इतर काही प्रतिनीधींकडुन माञ शेतक-यांची क्रुर चेष्ठा केली जात असल्याचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले.पुढे बोलताना ते म्हणाले कि, देशाच्या इतिहासामध्ये प्रथमच महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात लाखोंचा पोशिंदा असणा-या शेतकरी बांधवांना भाजप-शिवसेनेच्या राज्यात   संपावर जाणे हि दुर्दैवी बाब असुन गेल्या १०० वर्षात शेतकरी कधीच इतका अडचणीत आला नव्हता.शिवसेना सत्तेत असली तरी ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असुन  संपाला शिवसेनेचा पुर्णपणे पाठिंबा असल्याचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव (पाटील) यांनी  सांगितले.

या वेळी  बोलताना ते म्हणाले कि, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेसाठी चांगली कामे करत असताना त्यांच्याच सरकारमधील माधव भंडारी व रावसाहेब दानवे यांच्यासारखे काही लोक शेतक-यांची क्रुर चेष्ठा  करत असुन  शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी असल्या लोकांना त्यांची जागा दाखवुन दिली पाहिजे.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रविंद्र करंजखेले,अनिल काशिद,तालुकाप्रमुख पोपट शेलार,शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ,ग्राहक संरक्षण उपजिल्हाध्यक्ष किरण देशमुख,युवा सेल उपजिल्हाधिकारी बाप्पु शिंदे,नागरगाव शाखाप्रमुख कुंडलिक पवार आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या