'त्या'गावात रंगला अनोखा वाढदिवस सोहळा (Video)

निमोणे, ता. २ जून २०१७ (सतीश केदारी) : जुन महिन्यातील पहिल्याच दिवशी अनेकांचे वाढदिवस असतात.परंतु या गावात माञ ज्येष्ठांचे एकञितपणे अनोखा वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला.जुन महिना अन त्यात पहिलाच दिवस.त्या दिवशी अनेकांचे वाढदिवस असतात.त्यामुळेच पहिल्या दिवशी दिवसभर वाढदिवस साजरे करतानाची अनेकांची धावपळ पहायला मिळत होती.शिरुर तालुक्यातील निमोणे(ता.शिरुर) येथील ग्रामस्थांनी माञ या दिवसाचे अौचित्य साधुन एक नाही तर तब्बल दहा मान्यवरांचे वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले होते.यानुसार गावातील मंडळींनी सायंकाळी अत्यंत साधेपणाने नियोजन करत गावच्या सरपंच जिजाताई दुर्गे, बॅंकेत मॅनेजर पदावर असलेले महिपती काळे, उद्योजक रोहिदास काळे, मेजर जंबु गव्हाणे, तात्याबा काळे, उद्योजक दत्ता जाधव, परिवहन सेवेतील कर्मचारी राजेंद्र काळे, शिक्षक शिवाजी वाळके, संतोष काळे पञकार बाळासाहेब गायकवाड आदी मिळून सुमारे दहा मान्यवर व्यक्तींचा एकञित वाढदिवस साजरा करण्यात आला.

या मान्यवरांमध्ये सर्वच विविध क्षेञात काम करणारी ही ज्येष्ठ मंडळी होती.तर काहींनी आयुष्यात प्रथमच वाढदिवस साजरा केल्याचे सांगत आयोजकांचे आभार मानले.या अनोख्या अभिष्टचिंतन सोहळ्याला शिरुर ग्रामीण न्हावरा गटाचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रविबापु काळे, माजी सरपंच विजय भोस, यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करणा-या निमोणे आयडॉल्स ग्रुप चे या वेळी सर्वांनी विशेष कौतुक केले.कार्यक्रमाचे सुञसंचालन डॉ. पुरुषोत्तम जगदाळे यांनी केले तर आभार नवनाथ गव्हाणे यांनी मानले.

शिरुर तालुक्यात प्रथमच एका गावात ज्येष्ठांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या