शिरुर च्या दबंग 'लेडी सिंघम' ची बदली ?

शिरुर,ता.३ जुन २०१७(सतीश केदारी) : शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत चौकाचौकात टवाळखोरांवर दहशत जबरदस्त दहशत बसविलेल्या अन महिलांसाठी सुरक्षेचे कवच  वाटणा-या 'त्या' लेडी-सिंघम'ची बदली झाली असल्याची माहिती मिळते.

शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत प्रामुख्याने चौका-चौकात महिला- व मुलींची छेड काढणा-या टवाळखोरांवर शिरुर पोलीस स्टेशन च्या पोलीस उपनिरीक्षक अनिता होडगे यांनी जबरदस्त दहशत बसविली आहे.शिरुर शहरात प्रामुख्याने सि.टी.बोरा कॉलेज,विद्याधाम प्रशाला, एस.टी स्टॅंड, आदी भागात होडगे यांनी नियुक्ती झाल्यानंतर 'पांच मिनिटात पोलीस' अशा प्रकारची फास्ट पोलीसींग राबवत घटना घडल्यानंतर व घटना घडण्यापुर्वीच पोहोचत असल्याने टवाळखोरांची एकच भांबेरी उडत असे.तसेच अनेक निसटलेले असे टवाळखोर देखिल पुन्हा त्यांच्या कार्यपद्धतीमुळे लवकर ताब्यात घेतले जायचे अन त्यांच्यावर तत्काळ शिक्षा देखिल व्हायची.त्यामुळे या दबंग लेडी सिंघम ची गाडी असल्याचे दिसले तरी अनेक पसार व्हायचे.त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील या पुर्वी घडणा-या महिला अत्याचाराच्या घटना देखिल त्यांच्या काळात कमी घडल्याची नोंद आहे.

महिला व मुलींना देखिल मोबाईल नंबर दिल्याने मुली अडचणीच्या काळात स्वत:हुन फोन करत असल्याने काही गुन्हे घडण्यापुर्वीच प्रतिबंध घालण्यात आल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.त्याच प्रमाणे इतर अनेक महत्त्वाच्या घटनांना देखिल त्यांनी आळा घालण्यात यश मिळविले आहे.त्यांच्या कार्यपद्धतीमुळे महिला अवैध विक्रेत्यांची देखिल चांगलीच पळापळ होत होती.त्यामुळे दारुधंदे  बंद करण्यात चांगलेच यश आले होते.
शिरुर शहरात वाढलेला विस्तार,शाळा व प्रमुख महाविद्यालये, प्रमुख महत्त्वाची ठिकाणे आदींमुळे नेहमी गर्दी असते.त्या मुळे शिरुर शहराला आता महिला पोलीस उपनिरीक्षकच मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या