निमोणेत झाला शेतक-यांचा उद्रेक

निमोणे,ता.३ जुन २०१७ (तेजस फडके) : संपुर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला पाठींबा जाहीर करण्यासाठी शुक्रवारी(ता.२) रोजी निमोणे येथील मुख्य चौकात निमोणे व शिंदोडी येथील शेतकऱ्यांनी दुध व कांदा रस्त्यावर फेकले सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला.

यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे बाळासाहेब घाडगे म्हणाले शेतकऱ्यांनी जी एकजुट दाखविली ती महत्वाची असुन आता सरकारला जाग आल्याशिवाय राहणार नाही.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रविबापू काळे म्हणाले, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासुन शेतकरी संपावर जाण्याची हि पहिलीच वेळ असुन गेल्या तीन वर्षात सरकारने शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडलं आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश आता थांबु शकत नाही.सरकारने स्वामिनाथन आयोग लागु करावा तसेच शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी करावी.शिवसेनेचे शेतकरी तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ म्हणाले, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही.त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी कांदा बाजारपेठेत नेण्याऐवजी जमिनीतच गाडून टाकला.

यावेळी निमोणे गावच्या सरपंच जिजाताई दुर्गे, भाजपचे जे.आर.काळे, रविंद्र थोरात ,डॉ.पुरुषोत्तम जगदाळे,राष्ट्रवादीचे दत्तात्रय जाधव,संजय काळे,संतोष काळे, रामकृष्ण गायकवाड,कृष्णा माने, शेतकरी संघटनेचे भरत काळे,अंकुश जाधव, शिवसेनेचे दौलत ओव्हाळ, अनिल ओव्हाळ व अनेक आंदोलनकर्ते शेतकरी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या