शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील आठ आरोपी हद्दपार

शिरुर,ता.५ जुन २०१७(प्रतिनीधी) : शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील आठ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असल्याची माहिती शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिली.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील पप्पु सचिन बाळासाहेब राजापुरे(रा.कामाठीपुरा,शिरुर सध्या रा.ढवळपुरी, पारनेर तालुका) याच्यासह अरबाज रशिद खान(रा.बाबुराव नगर),नितीन शिवाजी काळे(रा.मौर्यपुरम सोसायटी,शिरुर),विजय मनोहर ढोबळे(रा.रेव्हेन्यु कॉलनी शिरुर), अजय मनोहर ढोबळे(रा.शिरुर), प्रशांत विठ्ठल शेकडे(रा.गुजरमळा), निलश अण्णासाहेब जाधव(रा.हुडको कॉलनी,शिरुर),कार्तिक नंदकुमार भागवत(रा.हुडको कॉलनी,शिरुर),अजिम बशीर पटेल (रा.हुडको कॉलनी, शिरुर), यांना शिरुर पोलीसांनी हद्दपारीच्या नोटिसा बजावल्या आहेत.तर या पैकी अजिम बशीर पटेल याची हद्दपार प्रलंबित असुन यातील सहा आरोपींना तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

शिरुर पोलीस स्टेशन चे तत्कालीन पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी यातील  आरोपींनी वेळोवेळी गुन्हे केल्याचे निदर्शनास  आल्यानंतर तडीपार करण्यासाठी प्रस्ताव पाठविले होते.त्यानुसार पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी पडताळणी करुन या संबंधि आदेश पारित केले.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या