'सिंघम' ची बदली झाली अन ढाबे चालु झाले...

शिरुर,ता.५ जुन २०१७(विशेष प्रतिनीधी) : शिरुर पोलीस स्टेशन चे 'सिंघम' पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या बदलीनंतर काही दिवसांपासुन बंद अवस्थेत असलेले ढाबे पुन्हा सुरु झाले असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.


शिरुर पोलीस स्टेशन ला दबंग पोलीस निरीक्षक म्हणुन उत्कृष्ठ कामाचा ठसा उमटवत गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणुन गावडे यांची विशेष ख्याती होती.त्यांच्या वर्षभराच्या कालावधीत पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करण्यात आले होते.तसेच महिला मुलींची छेडछाड करणारे बदमाश, टवाळखोरांवर तसेच शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत गैरकृत्य करणा-या गुंडांवर धडक कारवाई केली गेल्याने शिरुर पोलीस स्टेशन ला विशेष दबदबा निर्मान केलेला होता.त्यामुळे गावडे यांच्या पासुन अनेक जण नेहमी वचकुन असत.गावडे यांनी त्यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांवर कारवाई केल्याने, अनेकांना तडिपारीच्या नोटिसा दिल्याने गावडे यांना घाबरत अनेकांनी आपल्या धंद्यांनाच कायमचेच टाळे ठोकले होते.

परंतु पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांची बदली झाली असल्याचे कळताच शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांनी पुन्हा उचल खाल्ली असुन बस्तान बसविणे सुरु केले आहे.गावडे यांनी बंद केलेले कुलुपबंद ढाबे,अवैध धंदे पुन्हा शटरवर घेत सुरु झाले असल्याचे दिसत आहे.

त्यामुळे नवीन पोलीस खात्यातील अधिका-यांकडुन अवैध धंद्यांवर कारवाई होणार का ? असा  सवाल नागरिकांच्या तोंडुन ऐकायला मिळत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या