शिरुर तालुक्यात पाचव्या दिवशी 'बंद म्हणजे बंद'

शिरुर, ता.५ जुन २०१७(सतीश केदारी) : शिरुर तालुक्यात शेतक-यांनी पुकारलेल्या बंदला अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला असुन गावोगावी कडकडित बंद पाळण्यात आला.अनेक गावांनी परिणामी अनेक बाजारपेठा ओस पडल्याचे चिञ ठिकठिकाणी होते.तर पंचतळे येथे तब्बल सहातास रास्ता रोको करण्यात आला.

शिरुर तालुक्यात महाराष्ट्र बंद ची हाक देत प्रत्येक गावांनी सकाळपासुनच व्यापारी, शेतकरी, व सर्व घटकांनी संपात स्वयंस्फुर्तीने  सहभाग नोंदविला.अनेक गावांनी शेतक-यांनी शांततेत निषेध सभांचे आयोजन केले होते.शिरुर शहरात देखिल पहाटेपासुन बंदला पाठिंबा  देण्यासाठी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतला.त्यामुळे नेहमी गजबजणा-या बाजारपेठांनी आज माञ शुकशुकाट जानवत होता.तळेगाव ढमढेरे या मोठ्या गावात बाजारपेठ बंद असल्याचे चिञ होते.राज्यातील शेतकय्रांचा १ जून पासून सुरू झालेला संप आज पाचव्या दिवशीही सुरू आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यात सर्वच ठिकाणी कडकडीत बंद पाळला जात आहे. संतप्त शेतकय्रांनी नारायणगाव शिरूर मार्गावरती पंचतळे येथे आज सकाळ पासूनच एसटी महामंडळाच्या बससह सर्व वाहने अडवून धरल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला.संतप्त शेतकय्रांनी आपल्या बैलांना रस्यावरती उतरवून रस्त्यावरती दूध ओतून तब्बल ६ तासांपासून रस्ता रोखून धरला.संतप्त शेतकय्रांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकारमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधात घोषणाबाजी करत रस्ता रोखून धरला.सर्व शेतकरी बांधवांनी  शेतकरी संघटनांनी आज कडकडीत बंद पुकारला आहे.तब्बल ६ तासांपासून रास्ता रोखून धरल्या नंतर पोलिस व तहसिलदार यांच्या कडून शेतकरी आंदोलकांची समजूत काढल्या नंतर एसटी महामंडळाच्या बस सोडून देण्यात आल्या. मांडवगण फराटा येथे माउली मंदिरापासुन ते गावापर्यंत  भव्य रॅली काढुन सरकारच्या विरोधात शेतक-यांनी संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त केला.कॉंग्रेस ने देखिल पाठिंबा व्यक्त केला आहे.

वडगाव रासाई येथील शेतक-यांनी गाव बंद करुन आठवडे बाजार हा पुर्णपणे बंद ठेवला होता.इनामगाव व शिरसगाव काटा येथेही शेतक-यांनी संपुर्ण गावबंद ठेवत न्हावरे-इनामगाव तसेच इनामगाव काष्टी हा रस्ता काही काळ रोखुन धरत सरकारच्या विरोधी घोषणा दिल्या.शेतक-यांच्या मागण्या पुर्ण नाही झाल्यातर मांडवण फराटा येथील ग्रामस्थ मंगळवारी(ता.६) रोजी तीव्र आंदोलन करणार असुन मुख्यमंञ्याच्या पुळ्याचे दहण करणार आहे.तर इनामगाव येथील शेतकरी देखिल मंगळवारी(ता.६) रोजी भव्य रॅली काढुन तहसिलदार कार्यालयावर मोर्चा  नेणार असल्याचे तेथील शेतक-यांनी सांगितले.कुरुळी येथे देखिल सकाळी रस्त्यावर दुध ओतुन सरकारचा निषेध केला.निर्वी येथे ग्रामस्थांनी मुख्यमंञ्यांचा पुतळा दहन केला तसेच शेतमाल रस्त्यावर ओतुन संताप व्यक्त केला.

पुर्व भागातील महत्त्वाची बाजारपेठ समजली जाणारी न्हावरे येथे देखिल सर्वच व्यापा-यांनी संपात सहभाग नोंदविल्याने संपुर्ण व्यवहार ठप्प झाले होते. रांजणगाव सांडस येथे देखिल बंद पाळण्यात आला होता.शिरुर च्या पुर्व भागातील शिरसगाव काटा, इनामगाव, मांडवगण फराटा, वडगाव रासाई,आदी गावांमध्ये शेतक-यांनी संपाला उत्सफुर्तपणे प्रतिसाद देत गावबंद करुन गावातील बाजारपेठांसह सर्व कामकाज बंद ठेवले होते.या भागातील अनेक दुध संकलन केंद्रे देखिल पुर्णत: बंद ठेवलेली होती.परंतु अत्यावश्यक सेवा समजल्या जाणा-या दवाखाने व मेडिकल माञ सुरु होते.त्यामुळे रुग्णांची गैरसोय माञ कोठेही झालेली जाणवली नाही.संपाची तीव्रता मोठी असल्याने परिवहन सेवेवर देखिल परिणाम झाल्याने गावोगावी एसटी बसने प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या माञ रोडावलेली दिसत होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या