शाब्बास बळिराजा ! अखेर तु करुन दाखवलंस...

शिरुर,ता.६ जुन २०१७(ठिकठिकाणच्या प्रतिनीधींकडुन) : बंद ची हाक संपुर्ण महाराष्ट्रभर दिली अन सर्वांनी उत्फुर्तपणे बंद यशस्वी करुन दाखविलाच.म्हणुनच बळीराजा स्वत:च्या हक्कासाठी पुन्हा उभारी घेत संपुर्ण तालुक्यासह जिल्हाच बंद यशस्वी करुन दाखविला.
शिक्रापुर(प्रा.एन.बी.मुल्ला) :  बंद १०० टक्के यशस्वी
शिक्रापूर येथे शेतक-यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सर्व दुकाने व बाजारपेठ बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.शिक्रापूर(ता.शिरूर) येथे शेतक-यांच्या आंदोलनाला व महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त पाठींबा देण्यासाठी आज सर्व दुकाने बंद ठेवण्यात आला होती.सकाळी कांही दुकाने उघडी होती मात्र कांही युवा कार्यकत्र्यांनी सर्वच दुकाने बंद ठेवून महाराष्ट्र बंदला 100 टक्के पाठींबा देवून शासनाच्या धोरणांचा निषेध करण्याचे आवाहन केल्यानंतर सर्व व्यापारी, उद्योजक व छोटया मोठया व्यावसायिकांनी आज स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली होती.त्यामुळे पेठेत आज शुकशुकाट होता|सर्वपक्षीय कार्यकर्ते या महाराष्ट्र बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.परीसरातील मुखर्इ, जातेगाव, धामारी, पिंपळे जगताप, करंदी, सणसवाडी, वढू येथेही सर्व नागरीकांनी कडकडीत बंद पाळला.एकंदरीत परीसरात बंद 100 टक्के यशस्वी झाल्याचे चित्र होते.पुणे–अहमदनगर या वर्दळीच्या मार्गावर देखील महाराष्ट्र बंदमुळे शुकशुकाट होता

शिंदोडी(तेजस फडके) : दुकाने उघडलीच नाहीत
शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात महाराष्ट्र बंदला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला.निमोणे,गुनाट,करडे या गावात ग्रामस्थांनी गावातील सर्व व्यवहार तसेच दुकाने बंद करुन करुन सरकारच्या विरोधात कडकडीत बंद पाळुन निषेध नोंदवला.निमोणे,करडे, गुनाट येथे सकाळी शेतकऱ्यांनी व गावातील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडलीच नाहीत तसेच रास्ता रोको करुन शांततेच्या मार्गाने आंदोलन करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.निमोणे येथील कांग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते माऊली काळे म्हणाले.सरकारने शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी करावी.तसेच खते , औषधे व बियाण्याचे दर कमी करावेत.यावेळी शेतकरी संघटनेचे भरत काळे म्हणाले,माधव भंडारी यांनी पोलीस संरक्षण न घेता बाहेर पडावे मग शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखवतील.यावेळी मोठया प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

तळेगांव ढमढेरे(जालिंदर आदक) :   तळेगाव ढमढेरेचा आठवडा बाजार बंद
शिरूर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या तळेगाव ढमढेरे येथील सोमवारचा आठवडा बाजार व बाजारपेठा बंद ठेऊन तळेगावकरांनी व आसपासच्या शेतकरी बांधवानी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन सरकारचा निषेध नोंदवून कडकडीत बंद ठेऊन व्यापारी व शेतकरी बांधवांनी पाठींबा दिला.तळेगाव ढमढेरे येथे सोमवारी आठवडा बाजार नियमित भरत असतो आजपर्यंत एकही दिवस बाजार बंद ठेवला गेला नव्हता परंतु शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्तीसाठी आज तळेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील शेतमाल विकण्यासाठी आणला नाही त्यामुळे आज आठवडा बाजार भरला नाही राज्यव्यापी शेतकरी संपाला वाढता पाठींबा मिळत आहे सकाळपासून ग्रामस्थ चौकाचौकात ठाण मांडून बसले होते. हॉटेल, किराणा दुकान, स्वीटहोम, पानटपरी, वाहनदुरुस्ती दुकाने, हार्डवेअर, कपड्यांची दुकाने, सोनारची दुकाने अशी अनेक दुकाने सकाळधरून बंद ठेवण्यात आल्यामुळे सर्व व्यवहार बंद असल्यामुळे सगळीकडे सकाळीच शुकशुकाट झाला होता एरवी सकाळी एस टी बस थांब्यावर चहा व गप्पा मारण्यासाठी गर्दी झालेली असते मात्र आज ती गर्दी दिसत नव्हती.ज्यातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी गेली पाच दिवस संपावर गेले असून शेतकऱ्यांच्या संपाला पाठींबा व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सरकारने तातडीने मान्य करव्यात यासाठी तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, टाकळी भिमा, शिवतक्रार म्हाळुंगी, निमगाव म्हाळुंगी, उरळगाव, दहिवडी, धानोरे, या गावात हि बंद पाळण्यात आला असून या सर्व गावांनी तळेगावचा आठवडा बाजार बंद ठेऊन शेतकऱ्यांचा संपाला पाठींबा दिला आहे, आठवडा बाजार भरला नसल्यामुळे शेतकऱ्यांसह अनेक नागरिकांची गैरसोय झालेली आहे आदल्यादिवशी रविवारी तळेगावातून दवंडी देण्यात आली होती सोमवारी बाजार बंद आहे व बाजार पेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात यावी, आज सकाळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता परंतु एकही शेतकरी माल घेऊन विकण्यासाठी आला नाही.सोमवारी आठवडा बाजारात पालेभाज्यासह मेंढ्या व शेळ्यांचा मोठा बाजार भरत असतो परंतु बाजार बंद असल्यामुळे तो बाजारही बंद ठेवण्यात आला होता या बाजारात मोठ्याप्रमाणावर उलाढाल होत असते परिसरातील काहींना याची कल्पना नसल्यामुळे शेळ्या मेंढ्या घेऊन बाजारात आले होते परंतु त्यांना मोकळ्याच हातानी परतावे लागले आहे आज तळेगावातील आठवडा बाजार पूर्णपणे बंद ठेवला असल्याचे चित्र याआधी कधीच नसल्याचे येथील ग्रामस्थ सांगत होते.

शिरुर (सतीश केदारी)शिरुर शहर व तालुका कॉंग्रेस चा संपास  पाठिंबा
शिरुर तालुका काँग्रेस कमिटी, शिरुर तालुका महिला काँग्रेस कमिटी, शिरुर शहर काँग्रेस कमिटी व सर्व पदाधिकारी व सदस्य, शिरुर तालुका युवक काँग्रेस,शिरुर शहर युवक काँग्रेस यांचे वतीने गेल्या 3 वर्षे सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सरकार अपयशी ठरले असल्याने सरकार चा निषेध तसेच शेतकरी वर्गाचे महाराष्ट्र बंद ला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे बद्दल शिरुरचे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले त्या वेळी शिरुर तालुका अध्यक्ष वैभव यादव, उपाध्यक्ष सुभाष पाचर्णे, शिरुर शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष किरण आंबेकर, उपाध्यक्ष अभयजी सुराणा, प्रदीपजी बोरा, ज्योतीताई हांडे, उमेश पाचुंदकर, व शिरूर शहर काँग्रेस युवक अध्यक्ष अमजद पठाण व काँग्रेस कार्यकर्ते हजर होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या