विवाहात खर्च टाळुन 'त्या'कुटुंबाची १ लाखाची मदत

शिरुर,ता.७ जुन २०१७(सतीश केदारी) : विवाहात अनावश्यक खर्चास फाटा देत उरळगाव येथील कुटुंबाने बीड च्या अनाथालयास सुमारे १ लाखाची मदत दिल्याने समाजात नवा आदर्श घालुन दिला आहे.

पुणे जिल्हयातील शिरुर तालुक्यातील उरळगाव येथील यशवंत केरु जांभळकर यांचे पुञ सुनिल व गांजीभोयरे(ता.पारनेर) येथील भाउसाहेब मंडाजी पांढरे यांची कन्या वधु राधिका यांचा विवाहसोहळा शिरुर येथे नुकताच पार पडला.उच्चशिक्षित असणा-या सुनिल यांना सामाजिक क्षेञाची विशेष आवड आहे.त्यामुळे विवाह समारंभात जास्त उधळपट्टी न करण्याचे ठरवले व त्यानुसार त्यांनी गेवराई(ता.बीड)येथील सहारा या सुमारे ९० अनाथ मुले निवासी राहणा-या संस्थेस लग्नात मान्यवरांच्या हस्ते सहारा अनाथालयाचे संस्थापक संतोष गर्जे यांच्याकडे एक लाख रुपये किंमतीचा धनादेश देउ केला.

या वेळी शिरुर चे माजी आमदार अशोक पवार यांनी या कुटुंबाने अनाथांसाठी मदत दिल्याने समाजात नवा आदर्श घालुन दिला असल्याचे सांगत समाजात अशा प्रकारे पायंडा पडने गरजेचे असल्याचे सांगितले.संतोष गर्जे यांनी शिरुर तालुक्यात प्रथमच या कुटुंबाने नवा पायंडा  पाडला असुन समाजातील वंचित व विशेष मुलांसाठी देखिल मदतीचा हात द्यावा असे आवाहन केले व सर्वांचे आभार मानले.

या प्रसंगी शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक,अतिरिक्त पोलीस महासंचालक शहाजी सोळुंके, माजी आमदार प्रकाशअण्णा शेंडगे,आर्यन चंदनकर,उरळगाव चे माजी सरपंच सुनिल साञस व मान्यवर उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या