सादलगावात शिवराज्याभिषेक दिन साजरा

सादलगाव,ता.७ जुन २०१७(संपत कारकुड) : येथे शिवराज्याभिषेक स्थापना दिनानिमित्त ग्रामपंचायतसमोर भगवी गुढी उभारुण शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

ज्या दिवशी शिवाजी महाराज छत्रपती झाले आणि शिवशक दिनाचा प्रारंभ झाला तो दिवस 6 जून होता.या दिवशी स्वराज्याचा स्थापना करण्यात आली. याच मंगल दिवसाचे महत्व लक्षात घेवून चालू वर्षापासुन ग्रामपंचायतच्यावतीने सरपंच निर्मलाताई मिठे, उपसरपंच अविनाष पवार, सदस्य देवीदास होळकर, निर्मला केसवड, भाऊसाहेब गायकवाड, संजय पवार, माणिक अडसूळ, शिवाजी जाधव, राजेंद्र धावडे,अशोक मिठे, राजेंद्र फडतरे, विष्णु होळकर तसेच ग्रामसेविका राणी रासकर आदी ग्रामस्थांनी कलशासह भगवा ध्वजाची गुढी उभारुन या गुढीचे पाचवेळा अष्टगंधांनी पूजा केली तसेच छत्रपती षिवाजी महाजराजांच्या आसनस्थ पुतळयासहार घालुन पुजन करुन छत्रपती षिवाजी महाराजांचा नावाचा जयघोष करण्यात आला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या