भाउ...टपरी पुनर्वसनाचं काय झालं?

शिरुर,ता.७ जुन २०१७ (धर्मा मैड)  : शिरुर शहरात गेल्या  चार वर्षांपूर्वी रस्तारुंदीकरणासाठी काढलेल्या  रस्त्याच्या दुतर्फा असणा-या टपरीधारकांचा पुनर्वसनाचा प्रश्न आजही कायम असुन शहराचे नेते म्हणविणा-या कडुन या  वाताहत झालेल्या टपरीधारकांना केवळ आश्वासनांचे गाजर दाखविण्यात येत आहे.रस्त्यावर आलेल्या टपरीव्यवसायिकांचा प्रपंच टिकुन राहण्यासाठी नेते म्हणणारे व नगरपरिषद निवडणुकीत टपरी पुनर्वसनाचे आश्वासन  देणारे पुनर्वसन करणार का ?याबाबत टपरी धारकांमध्ये संभ्रमावस्था आहे.

शिरुर शहरात  ३० वर्षापासून  जुन्या नगर पुणे मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा  सुमारे ४५० टपरी व्यवसायिक आपल्या टपरीमध्ये व्यवसाय करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होते.अशा परिस्थितीत तत्कालिन आमदार अशोक पवार यांनी शिरुर शहरातील  रस्ता  रूंदीकरणाच्या नावाखाली  हे टप-यांचे अतिक्रमण काढले.याबाबत त्यांनी एका वृतपत्रामध्ये जाहिरपणे वाच्यता करून हे टप-यांचे अतिक्रमण मी काढले असल्याचे सांगुन त्यांचे पुनर्वसन करणे बंधनकारक नाही परंतु पुनर्वसन करू असे आश्वासन दिले .त्याप्रमाणे टपरी पुनर्वसनासाठी शिरुर बसस्थानकाशेजारील जागेचा प्रस्ताव शासन दरबारी देऊन तो मंजूर ही करुन घेतला.त्या पुनर्वसनासाठी नगरपरिषद सभागृहनेते प्रकाश धारीवाल व सहकारी नगरसेवकांनी पालिकेच्या सभागृहात ठराव घेऊन या  टपरी पुनर्वसनासाठी घेतलेल्या जागेची किंमत १कोटी ८७ लाख रूपये शासनाकडे भरली. त्यानंतर नगरपरिषद निवडणुकांपुर्वी या जागेचे भूमिपूजन करु व काम चालू करण्याचे आश्वासन नेत्यांनी दिले.

परंतू हे आश्वासन हवेत विरून गेले.व हा टपरी पुनर्वसनाचा मुद्दा नुकत्याच झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत प्रमुख मुद्दा ठरत सत्ताधारी प्रकाश धारीवाल यांच्या नेतृत्वाखालील शिरुर शहर विकास आघाडी व भाजपाचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पॅनलने आपल्या परीने पुनर्वसनाचे आश्वासन दिले.परंतु निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या प्रकाश धारीवाल यांच्या शहर विकास आघाडीने गेले पाच महिन्यात पुनर्वसनाचे बाबत कुठलेही ठोस पाऊल उचलल्याचे जाहीर केलेले नाही.त्यामुळे या टपरी पुनर्वसनासाठी शासनाकडुन घेतलेल्या शिरुर बसस्थानकाशेजारील जागेत विस्थापित झालेल्या ख-या टपरी धारकांचे पुनर्वसन होणार का ? या टपरी धारकांना रस्त्यावर पाल ठोकुन यापूढील काळात ऊन ,वारा ,पाऊस याचा सामना करत रस्त्यावरच प्रपंचाचा गाडा ओढावा लागणार या बाबत संभ्रमावस्था आहे.

पुनर्वसनाचे आश्वासन हवेत,टपरीधारक रस्त्यावर...!

शिरुर शहराच्या विकासाला साथ देत व गेली चार वर्षे  नगरीच्या नेत्यांच्या विश्वासावर हे टपरीधारक असुन हक्काच्या दुकान गाळे मिळण्याच्या भरवश्यावर हे टपरीधारक रस्त्यावर टपरी असलेल्या जागी बसून प्रपंच्याचा गाडा ओढत आहेत.त्यामूळे रस्त्यावर त्रास काढत असलेल्या या  टपरीधारकांचा विचार निवडणुकीच्या वेळेस जनतेची सेवा करण्याचे भाषण करणारा कोणी तालुक्यातील व शहराचे भुषण असणारे व गेल्या पंधरा वर्षापासुन आश्वासन  देणारे नेते करतील काय ?हाच सवाल उपस्थि होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या