तळेगाव ढमढेरे गावातील वाहतूक कोंडी प्रश्न ऐरणीवर

तळेगाव ढमढेरे,ता.७ जुन २०१७ (जालिंदर आदक) :  तळेगाव ढमढेरे(शिरूर) येथे एस.टी.स्टँड चौकात सकाळच्या दरम्यान वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालकांचे हाल होत आहे तसेच गिताई मंगल कार्यलयापर्यंत लांबलचक वाहतुकीच्या गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या असताना पोलिस प्रशासन जाणीवपूर्वक दुलक्ष करत आहे.

तळेगाव येथील सावतामाळी मंगल कार्यलयाच्या समोर सतत वाहतुक कोंडी असते परंतु याकडे ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न जागेवरच राहत आहे. एस.टी.स्टँड चौकात नागरिक बेशिस्त पद्धतीने दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी करत असल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.

विशेषता हाकेच्या अंतरावर पोलिस चौकी असूनही वाहतूक कोंडी हटवन्यास पोलिस तसदी घेतानी दिसत नाहीत.त्यामुळे वाहन चालकाना तसेच विद्यार्थ्यांनाही नाहक त्रास सहन करवा लागतो व वेळही खर्च होतो.काही व्यवसायिकांची दुकानेही रस्त्यालगत असल्याने ग्राहकांनी दुचाकी दुकानाबाहेर उभी केल्याने त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होतो.ग्रामपंचायत प्रशासनही याकडे डोळे झाक करत असल्याचे दिसत आहे.

वाहतूक कोंडीची समस्या गेल्या अनेक वर्षापासून असतानाही पोलिस आणि ग्रामपंचायत यांच्यात या विषयावर समन्वय बैठक झाल्याचे चित्र पहन्यास मिळत नाही.शिक्रापुर-न्हावरा रस्त्यावरच ही वाहतूक कोंडी तळेगावच्या मुख्य चौकात होत असल्याने प्रशासनाने त्वरित लक्ष घालून वारंवार होणारी वाहतूक कोंडी कायमची सोडवावी अशी मागणी होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या