मांडवगण फराटात मुख्यमंञ्यांच्या पुतळ्याचे दहन

मांडवगण फराटा,ता.७ जुन २०१७ (राजेंद्र बहिरट) : मांडवगण फराटा व परिसरात शेतकरी संपाची धग कायम असुन आज सहाव्या दिवशी मांडवगण फराटा येथील शेतक-यांनी मुख्यमंञ्याच्या पुतळ्याचे दहन करुन तलाठी कार्यालयाला टाळे ठोकले होते.तर इनामगाव च्या शेतक-यांनी भव्य रॅली काढुन शिरुर तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता.

शिरुर तालुक्यात गेल्या सहा दिवसांपासुन शांततेत व सनदशीर मार्गाने आंदोलन सुरु असुन आज मंगळवार(दि.६) रोजी मांडवगण फराटा येथील शेतक-यांनी जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.त्याचप्रमाणे इनामगाव येथील शेतक-यांनी मोटारसायकल वरुन इनामगाव ते शिरुर तहसिलदार कार्यालय अशी भव्य रॅली काढुन तहसिलदार कार्यालयावर मोर्चा नेला होता.गेल्या काहि दिवसांपासुन शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातुन मोठ्या प्रमाणावर  होणारे दुधाच्या संकलनात मोठी घट झाली असुन आज (ता.६) रोजी बहुतांश भागात देखिल संकलन होउ शकले नाही.

कुरुळी(ता.शिरुर) येथुन देखिल मुंबई,पुणे मोठ्या बाजारात तरकारीची विक्री केली जाते परंतु ती देखिल या भागातुन ठप्प असल्याचे अनेकांनी सांगितले.इनामगाव येथे मंगळवार चा आठवडे बाजार असतो परंतु गावाने एकमुखाने संपास पाठिंबा  दिल्याने आठवडे बाजार देखिल बंद ठेवलेला होता.याबाबत अनेक शेतक-यांनी संप अजुन काहि दिवसांत न मिटल्यास शेतक-यांचे देखिल नुकसान होणार असुन मुख्यमंञ्यांनी तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या