'त्या'महिलेच्या कुटुंबाला चार लाखाची शासकिय मदत

इनामगाव, ता.८ जुन २०१७ (सतीश केदारी) : इनामगाव (ता.शिरुर) येथे महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यु झाल्याची घटना घडली होती.त्या महिलेच्या कुटुंबाला अवघ्या महिनाभरातच शासनाच्या,लोकप्रतिनीधी व ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे चार लाखाची मदत मिळु शकली.संकेतस्थळ www.shirurtaluka.com ने सर्वप्रथम याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.

इनामगाव (ता.शिरुर) येथे (ता.७ मे) रोजी सायंकाळच्या सुमारास अलका बबन थोरात (वय-४२) या शेतामध्ये काम करण्यासाठी गेल्या असता अंगावर वीज कोसळुन त्यात त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यु झाला होता.यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी त्यांच्या कुटुंबाला अर्थिक मदतीचा हात दिला होता. या कुटुंबाची माहिती घेत शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्ने यांनी लवकरात लवकर मदत मिळवुन देतो असे आश्वासन देखिल दिले होते.यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तसेच तत्कालीन तहसिलदार राजेंद्र पोळ, विभागीय अधिकारी भाऊ गलंडे,यांनी आवश्यक त्या कागदञाची त्वरित पुर्तता केली.व आमदार बाबुराव पॉचर्णे यांनी शासनदरबारी यासाठी विशेष पाठपुरावा केला.

गुरुवारी(ता.८) रोजी थोरात यांच्या कुटुंबियांना आपत्तीनिधीतुन चार लाख रुपये मदतीचा धनादेश शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, नवनियुक्त तहसिलदार रणजित भोसले, यांच्या हस्ते देण्यात आला.या प्रसंगी इनामगाव च्या सरपंच मंगल म्हस्के, विजयसिंह मोकाशी,तात्या घाडगे,स्वाती शिंदे,तुकाराम मचाले, श्रीगोंदा  कारखान्याचे संचालक श्रीनिवास घाडगे,सखाराम भालेराव आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या