शिरुर तालुक्यात कर्जमाफीच्या घोषणेनंतर आनंदोत्सव

शिरुर,ता.११ जुन २०१७(संपत कारकुड)  : सरकारने सरसकट कर्जमाफीची घोषणा करताच शिरुर तालुक्याच्या विविध  भागात शेतक-यांनी फटाके फोडुन व मिठाई वाटुन एकच जल्लोष केला.अनेक शेतक-यांनी संकेतस्थळ www.shirurtaluka.com  ने शेतक-यांच्या बाजुने भक्कम उभेराहत सडेतोड वृत्तांकन केल्याने आभार मानले.

एक जुन पासुन संपुर्ण राज्यभर शेतक-यांनी संपुर्ण कर्जमाफी मिळावी,स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी संप पुकारला होता.त्यानुसार शहराला ग्रामीण भागातुन भाजीपाला, दुध, आदींचा पुरवठा बंद केला होता.तसेच पाच जुन ला सर्वञ स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवत कडक बंद देखिल पाळुन मोठा प्रतिसाद दिला होता.ग्रामीण भागात ठिकठिकाणी दुध, भाजीपाला रस्त्यावर ओतुन तीव्र संताप व्यक्त करुन मागण्या मान्य न झाल्यास  अधिक आंदोलन तीव्र करण्याची देखिल तयारी केलेली होती.परंतु सायंकाळी सुकाणु समिती व सरकारच्या प्रतिनीधींच्या झालेल्या बैठकित अल्पभुधारक शेतक-यांचे कर्ज आजच माफ करण्याची घोषणा करण्यात आली तर सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता देण्यात आली.

हा निर्णय जाहिर झाल्याचे समजताच शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात शेतक-यांनी एकच जल्लोष केला.त्यानुसार मांडवगण फराटा येथे फटाके फोडण्यात आले तर शिरसगाव काटा येथेही फटाके फोडुन व मिठाई वाटुन एकप्रकारे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.बेट भागातील वडनेर खुर्द, कवठे येमाई,पिंपरखेड तसेच पुर्व भागातील इनामगाव,न्हावरे, वडगाव रासाई,कुरुळी येथील ग्रामस्थांनी देखिल समाधान व्यक्त केले.बेट भागातील वडनेर खुर्द, कवठे येमाई

शिरुर तालुक्यात संपाचे केंद्र ठरलेल्या आमदाबाद येथील शेतक-यांनी देखिल आनंदोत्सवात सहभाग घेतला.या वेळी किसान क्रांती राज्य समन्वय समितीचे तालुका संघटक नितीन थोरात यांनी हा शेतकरी एकजुटीचा विजय असल्याचे प्रतिक्रिया देताना सांगितले.तसेच विविध गावातुन संकेतस्थळ www.shirurtaluka.com ने संपाच्या सुरुवातीपासुन शिरुर तालुक्यात सातत्याने सडेतोड व निर्भिड बाजु घेत वृत्तांकन केल्याने विशेष अभिनंदन व आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या