इनामगावला टिळक विद्यापीठाच्या अभ्यासकांची भेट

इनामगाव, ता.१२ जून २०१७ (सतीश केदारी) : ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेल्या इनामगाव ला पुण्यातील अभ्यासकांनी नुकतीच भेट दिली.

शिरुर तालुक्याचे पुर्व भागातील इनामगांव(ता.शिरुर) हे गांव तालुक्याचे प्रवेशद्वार शेवटचे टोक समजले जाते. इनामगावला ग्रामदैवत सिद्धेश्वराचे हेमाडपंथीय मंदीर घोडनदीतीरी असून त्याचप्रमाणे सन १९६७ ते १९८२ च्या कालखंडात   उत्खनन केल्यानंतर आर्यकालीन संस्कृती शी निगडीत अवशेष व भांडी सापडली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पहिली शेतीला कालव्यातुन पाणी देण्याची पद्धत, पहिली स्वस्तिककला, आदी मिळुन आलेले होते. आदी कारणांमुळे इनामगाव येथील उत्खनन ठिकाण व मंदिराचा अभ्यास करण्यासाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ. श्रीनंद बापट, उमेश दिक्षित, चंदन रानडे व यांच्या चमूने येथील विविध ठिकाणांची पाहणी केली. त्याचप्रमाणे मंदिर परिसरात केलेल्या कामांचे कौतुक केले.

या वेळी इनामगाव च्या सरपंच मंगलताई म्हस्के, ग्रा.पं सदस्य तुकाराम मचाले यांनी इनामगावच्या विविध ठिकाणांची माहिती अभ्यासकांना दिली. इनामगावला तिर्थक्षेञ व पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा या साठी ग्रामस्थ प्रयत्न करत असल्याचे सांगत अभ्यागतांसाठी सोयी उपलब्ध करण्याची मागणी केली.

या प्रसंगी विजय मोकाशी, राजाराम कांबळे, मयुर मोकाशी, विशाल भालेराव, पांडुरंग कुंभार, परशुराम मचाले, किरण खरात व पुण्याहून आलेले अभ्यागत, ग्रामस्थ उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या