रांजणगाव परिसरात चालतो वेश्या व्यवसाय- शेलार (Vdo)

रांजणगाव गणपती, ता. 11 जून 2017 (तेजस फडके): रांजणगाव औदयोगिक वसाहतीमधील व आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या हॉटेल व ढाब्यावर मोठया प्रमाणावर अवैध धंदे व वेश्या व्यवसाय चालत आहे, असा आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख पोपट शेलार यांनी www.shirurtaluka.com शी बोलताना व्यक्त केला. 'कॉफी उईथ शिरूर तालुका.कॉम'मध्ये शेलार सहभागी झाले होते.रांजणगाव औद्योगिक वसाहत ही आशिया खंडातील पंचतारांकित वसाहत आहे. या मध्ये अंदाजे ३०० कंपन्या असून राज्यातील विविध भागातून कामगार येथे कामाला येतात. त्यामुळे येथील ढाबे व हॉटेलमध्ये कायम गर्दी असते. हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली येथे अनेक अवैध धंदे चालू आहेत.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत पोलिस स्टेशन आहे. तरीही हे सगळं राजरोसपणे चालू आहे. त्यामुळे हे अवैध धंदे बंद करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने निवेदन देणार आहे. पोलिसांनी याची दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा ईशारा शेलार यांनी दिला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या