सरकारला उशीरा सुचलेले शहानपण- योगेश ओव्हाळ

शिंदोडी, ता.१३ जून २०१७ (प्रतिनीधी) : कर्जमाफी ही तर सरकारला उशीरा सुचलेले शहाणपन असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे शेतकरी तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ यांनी बोलताना दिली.

सरकारने शेतकरी संपानंतर सुकाणु समितीसोबत घेतलेल्या बैठकित कर्जमाफी चा निर्णय  घेतला. त्यानंतर शिरुर तालुक्यात देखिल या निर्णयानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

कर्जमाफी च्या निर्णयानंतर शिवसेनेचे शेतकरी तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि, शेतकरी आत्महत्या होण्यासाठी कर्जबाजारीपणा हेच प्रमुख कारण आहे. शेतक-यांचा सातबारा कोरा करावा हीच सर्वांची मागणी होती.सरकारने ती मान्य केली परंतु तत्वत: हा शब्द टाकल्याने सर्वांचाच गोंधळ उडाला आहे.सरकारने देखिल तत्वत: शब्द पाळुन सरसकट कर्जमाफी द्यायला हवी.शेतमालाला योग्य बाजारभाव मिळाला तर शेतक-यांवर आत्महत्येची वेळच येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या