बो-हाडेमळ्याजवळ वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

शिरुर, ता.१३ जुन २०१७ (प्रतिनिधी) : पुणे-अहमदनगर महामार्गावर बो-हाडे मळा जवळ  वाहनाच्या धडकेने झालेल्या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन शिवराम रजपुत (वय ४५) हे  शिरुर कडून कारेगाव कडे जात असताना बो-हाडेमळा नजीक बोलेरो जीपने दुचाकिस धडक दिली. यात रजपुत यांना व त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीस गंभीर मार बसला. त्यानंतर जखमींना तातडीने शिरुर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु बबन रजपुत यांना जास्त मार लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.

या प्रकरणी चंद्रकांत साहेबराव रजपुत (रा.पिंपळनेर, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. बोलेरो जीप (एम.एच.१४ इ.यु.०१७५) चे चालक शशिकांत महादेव सरोदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भिमगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या