मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला

शिरुर,ता.१३ जुन २०१७ (प्रा.एन.बी.मुल्ला) : शिरूर तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसांत सतत होणा-या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले तर पिकांचेही ठिकठिकाणी नुकसान झाले आहे.मात्र मान्सूनचे जोरदार आगमन होवून वरूणराजा बरसल्याने बळीराजा सुखावला आहे.

शिरुर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून शिरूर शहरासह तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी, घोलपवाडी ,कासारी ,दहिवडी, पारोडी ,उरळगाव ,न्हावरे ,आंबळे, करडे, रांजणगाव, कारेगाव, कोंढापुरी,आंबळे, करडे,मांडवगण फराटा,तळेगाव ढमढेरे, टाकळी हाजी,मलठण,जांबुत, चांडोह, कवठे येमाई,   आदी ठिकाणी मुसळधार पाउस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले.जोरदार वा-यासह आलेल्या या पावसामुळे ज्वारी ,बाजरी ,मका व चारा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.कांही ठिकाणी पिके भुर्इसपाट झाली आहेत.परीसरातील विट भट्टयांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले असून कांही ठिकाणी प्लॅस्टिक पेपरच्या सहाय्याने विटा झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.पावसामुळे ठिकठिकाणी विद्युत पुरवठाही खंडीत झाला होता.यावर्षी तालुक्यात वळीव पाउस झाला नव्हता त्यामुळे पाणी टंचार्इ जाणवत होती.

मात्र ब-याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पाउस बरसल्याने वाफे व ताली तुडुंब भरल्याने शेतीत सर्वत्र पाणीच पाणी झाले.ओढे, नाले वाहू लागल्याने परीसरातील शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.खरीपासाठी व पेरणीपूर्व मशागतीसाठी हा पाउस उपयुक्त असल्याने व पाण्याची समस्या सुटल्याने बळीराजा सुखावला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या