शिरुरच्या सेतूकेंद्रात चालतोय सावळा गोंधळ? (Vdo)

शिरुर, ता. १४ जून २०१७ (सतीश केदारी): शाळा सुरु होणार म्हणून दाखले मिळविण्यासाठी तासनतास तिष्टत राहावे लागत असल्याचे व या कार्यालयात सावळा गोंधळ सुरु असल्याचे चिञ पहायवास मिळते.काहि दिवसांपुर्वी बारावीचे निकाल लागले आहेत. शिरुर तालुक्यात शाळा सुरु व्हायला अवघे काही दिवसच राहिले असताना शिरुर तालुक्यातून पालकांसह विद्यार्थ्यांचे शिरुर तहसिल कार्यालयात सध्या एकच धावपळ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. शिरुर तालुका म्हणजे तसा मोठा लोकसंख्येचा तालुका. काही गावे पन्नास-पन्नास किलोमीटर अंतरावर. त्यामुळे दुरवरुन दाखल्यांसाठी धावपळ करणा-यांची संख्या जास्त.यात अगदी पिंपरखेड, काठापुर असो कि  इनामगाव, मांडवगण फराटा ही गावे.

शिरुर तहसिल कार्यालयात दाखले मिळविण्यासाठी इतक्या दुरवरुन अनेकजण येत असतात. परंतु, सेतु केंद्रात कुठलीही सुसुञता नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना याचा मोठा फटका बसत असून तत्काळ दाखले मिळविणे मोठे जिकिरिचे होउन बसते.

शाळा सुरु होण्यापुर्वी सेतु केंद्रात नागरिकांना दाखले त्वरीत मिळतात का? याबाबत सेतु केंद्रात सद्य;स्थितीची  पाहणी करण्यात आल्यानंतर अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी संपुर्ण दिवसभर पाहणी केली असता फारशी समाधानकारक कामाची पद्धत माञ दिसून आली नाही.

नागरिकांना अर्ज दाखल करण्यापासुन ते मिळवण्यापर्यंत भलतीच कसरत करावे लागत असल्याचे दिसुन आले तर याहून गंभीर बाब म्हणजे दोन पैसे जास्त दिल्याशिवाय  कागद पुढे सरकत नसल्याचे देखील निदर्शनास आले. नागरिकांनी शाळा सुरु होण्याच्या तोंडावर तातडीने दाखले मिळावे, कामात सुसुञता आणण्याची मागणी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या