तळेगाव ढमढेरे येथे अनोखी इफ्तार पार्टी साजरी

तळेगाव ढमढेरे,ता.१५ जुन २०१७(प्रा.एन.बी.मुल्ला) : सध्या सुरु असलेला मुस्लिमांचा पवित्र महिना म्हणजे रमजान या महिन्यात सर्व मुस्लीम बांधव महिनाभर दिवसभर रोजा म्हणजे उपवास करतात तर दररोज सायंकाळी हे रोजे सोडले जातात तर या रोजा सोडण्याच्या इफ्तार पार्टी मध्ये तळेगाव ढमढेरे येथे अनोखे हिंदू मुस्लीम एकतेचे दर्शन घडले.

तळेगाव ढमढेरे येथील आर पि आय चे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे हे गेली २२ वर्षांपासून स्वतः मुस्लीम धर्मियांचे रमजान चे रोजे करून दर वर्षी स्वतः इफ्तार पार्टी चे आयोजन करत असून हिंदू मुस्लीम ऐक्य घडविण्याचे काम करीत आहे. या वेळी देखील नवनाथ कांबळे व शिक्रापूर पोलीस स्टेशन यांच्या वतीने तळेगाव ढमढेरे येथील जामा मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान पाच रोजे धारक बालकांचा संपूर्ण पोशाख देऊन फेटे बांधत सन्मान करण्यात आला. या अनोख्या इफ्तार पार्टीने लहान बालके आनंदित झाले होते. तर या इफ्तार पार्टीमुळे सर्व धर्म समभावाचे एक उदाहरणच जनतेस पाहण्यास मिळत आहे.

या इफ्तार प्रसंगी शिक्रापूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत माने, गणेश वारुळे, प्रदीप भक्त, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगदाळे, शशिकांत बंड, अनंता बाठे, जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष मुनीर मोमीन, गानिभाई मोमीन,रामभाऊ जगताप, चांगदेव सोनवणे, बाळासाहेब भुजबळ, सुनील ढमढेरे, करीम मोमीन, सुदाम ढमढेरे, राजेंद्र घुमे ,सलीम बागवान यांसह अन्य मान्यवर व मुस्लीम बांधव उपस्थित होते.

यावेळी बोलत असताना तळेगाव ढमढेरे येथे हिंदू मुस्लीम बांधव एकोप्याने राहून समाजाला सामाजिक ऐक्याचा संदेश देत असल्याचे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर पि आय चे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे यांनी केले तर आभार जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष मुनीर मोमीन यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या