सत्तेचा वापर समाजासाठी करणार- सोनवणे (Video)

निर्वी, ता.१६ जुन २०१७ (सतीश केदारी) : सत्तेचा वापर हे जनतेच्या सेवेसाठीच करणार असल्याचे प्रतिपादन शिरुर खरेदी-विक्री संघाचे नवनिर्वाचित संचालक प्रदिप (आबासो) सोनवणे यांनी www.shirurtaluka.comशी बोलताना व्यक्त केले.शिरुर खरेदी-विक्री संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकित प्रदिप सोनवणे यांनी शिरुर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांच्या पुतण्याला चितपट केल्याने शिरुर तालुक्यात आबासो सोनवणे यांच्या नावाची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभुमीवर प्रदिप सोनवणे यांनी संकेतस्थळाशी थेट संवाद साधला.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, शिरुर तालुक्यात प्रथमच मी खरेदी-विक्री संघाची निवडणुक लढवली आहे. अद्याप फारसा निवडणुकिचा अनुभव नसताना शिरुर तालुक्यातील तमाम जनतेने भरघोस मते दिल्यानेच माजी आमदार पुतण्याला पराभूत करण्यात आले. त्यात अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले. निवडणुक हि तात्पुरती असते. त्यामुळे आगामी काळात हेवेदावे बाजुला ठेवुन सत्तेचा वापर हा जास्तीत जास्त समाजहितासाठीच करणार असून तालुक्यातील जनतेने जी संधी दिली, जो विश्वास दाखविला त्याबद्दल सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच असल्याचे सोनवणे यांनी बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या