दहा हजार रुपयाच्या कर्जाचं काय ?

शिरुर,ता.१८जुन २०१७(सतीश केदारी) : शेतक-यांना तातडीने खात्यात १० हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आलीय परंतु अद्याप बॅंकांना तसा कोणताच आदेश मिळाला नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास येत आहे.

संपुर्ण महाराष्ट्रात शेतक-यांनी संपाचे हत्यार उगारले.त्यानंतर सुकाणु समिती व सरकारचे प्रतिनीधी यांच्या बैठकित अल्पभुधारक शेतक-यांना तत्काळ कर्जमाफीची घोषणा केली.त्यानंतर सर्वञ शेतक-यांनी समाधान व्यक्त करत आनंदोत्सव साजरा केला.या नंतर सहकारमंञ्यांनी शेतक-यांना बियाणे-खते या साठी तत्काळ १० हजार रुपये खात्यातुन देण्याची घोषणा केली.या नंतर शेतक-यांच्या आशा अधिकच पल्लवित झाल्या.

गेल्या चार वर्षात यंदाच्या वर्षी प्रथमच वेळेवर मान्सुन चे आगमन झाले आहे.सगळीकडे समाधानकारक पाउस झाल्याने शेतकरी शेतीची मशागत अन पेरणी च्या कामात गुंतला आहे.या साठी लागणारी बि-बियाणे, खते खरेदीसाठी कृषी केंद्रात गर्दी करु लागला आहे.

या दहा हजार रुपयांच्या कर्जासंदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, शेतक-यांच्या खात्यात तशी रक्कम अद्याप वर्ग केलीच नसल्याचे दिसुन येत असुन या संदर्भात जिल्हा बॅंकांच्या कोणत्याही शाखांना अधिकृत आदेश मिळाला नसल्याचे समजते.

दहा हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यात मिळतील अशी आशा ठेवलेला शेतकरी माञ असाच किती दिवस आशेवर राहणार ? सहकारमंञी या संदर्भात आदेश केव्हा देणार? गरजु शेतक-यांना खरंचं हि रक्कम मिळणार का? असे  अनेक सवाल उपस्थित होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या