पाचुंदकरांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादीतील खदखद उघड

रांजणगांव गणपती,ता.१८ जून २०१७ (प्रतिनीधी) : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी अध्यक्षपदाचा व बाजारसमिती संचालकपदाचा राजीनामा दिला असल्याचे समजते.यावरुन पक्षातील नाराजांमधील खदखद पुन्हा उघड होत आहे.

शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीची नुकतीच सभापती-उपसभापती पदाची निवड पार पडली.या मध्ये डावलल्याने काहि संचालक नाराज झाले होते.त्यामुळेच पाचुंदकर यांनी राजीनामा दिल्याचे समजते. पुर्वीपासुनच शिरुर-आंबेगाव असा वाद या निवडणुकित दिसुन आला होता.त्याचप्रमाणे निवडणुकित पुन्हा समेट घडवुन आणत सर्व एकच असल्यासारखे म्हणत निवडणुक पार पडली व राष्ट्रवादीला घवघवीत यश देखिल मिळविता आले.

पाचुंदकर यांच्या अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे एकप्रकारे राजकीय भूकंप झाला असुन यावर पक्षश्रेष्ठी नक्की काय निर्णय घेणार याची उत्सुकता सर्वांना लागुन राहिली आहे.एकंदरीत यावरुन नाराजांमध्ये खदखद असल्याचे उघड होत  आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या