शिरुरला गस्ती दरम्यान गावठी कट्ट्यासह हत्यार जप्त

शिरुर,ता.१९जुन २०१७(विशेष प्रतिनीधी) : शिरुर पोलीसांनी गस्त घालत असताना राञीच्या नउच्या सुमारास एक गावठी रिव्हॉल्व्हर,तीन जिवंत काडतुसे, एक लोखंडी लांबीचा(४८सें.मी) सत्तुर,व दुचाकी करिझ्मा गाडी सह एकास अटक केल्याची माहिती शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिली.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,रविवार(दि.१८) रोजी राञी नउच्या सुमारास शिरुर शहरात शिरुर पोलीस हे गस्त घालत असताना पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेजवळ असणा-या चेतन इलेक्ट्रॉनिक्स समोर एक दुचाकि दिसली.या वेळी तपासणी केली असता,त्या व्यक्तीकडे कमरेला बेकायदा बिगर परवाना  गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर,त्या मध्ये तीन जिवंत काडतुसे, एक लोखंडी लांबीचा(४८सें.मी) सत्तुर, हे दुचाकी करिझ्मा गाडी नंबर (एम.एच.१२ डि.जे २००९) च्या सिटखाली मिळुन आला असुन एकुण सुमारे ६०१०० रुपये किंमतीचा माल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणी सचिन मोहन ओव्हळ (वय.२४,रा.पिंपरी कोलंदर,ता.श्रीगोंदा,जि.अहमदनगर) यास शस्ञ अधिनियम कलमाखाली अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी जितेंद्र केशव मांडगे यांनी फिर्याद दिली असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के.आर.घोंगडे हे करत आहेत.हा गुन्हा आज दुपारी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या