शिरुरचे नागरिक 'सुविधा' केंद्र झालयं 'असुविधा' केंद्र

शिरुर,ता.२४ जुन २०१७(संपत कारकुड) : शिरुर च्या सेतु केंद्रात अद्याप ही सावळा गोंधळच असुन नागरिकांना स्वत:चे दाखले हातानेच शोधावे लागत असल्याचे चिञ दिसत आहे.

सध्या दहावी बारावीचे निकाल लागले असल्याने अनेकांना विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी धडपड करावी लागत असुन अनेकांना आजही दाखल्यांसाठी सेतु चे उंबरठे झिजवावे लागत आहे.या संदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रार करुनही फारसा फरक पडला नसुन एजंटगिरी, व भ्रष्टाचार देखिल मोठ्या प्रमाणावर बोकाळला असल्याचे दिसुन येते.

प्रशासन गप्प का?
शिरुर तहसिलकार्यालयातील सेतु केंद्रातील सावळा गोंधळ कायम असुन नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणावर होत असताना याबाबत संबंधित प्रकार वरिष्ठांना सांगुनही यावर काहीच उपाययोजना करत नसल्याचे पहावयास मिळते.त्यामुळे नागरिकांची गैरसोय असुनही संबंधित विभाग गप्प का राहतो असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.त्या मुळे कि काय  शिरुर चे नागरिक सुविधा केंद्र हेच नागरिकांचे असुविधा केंद्र झाले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या