धनराज वाघ शिक्षण घेत चालवतो चहाची टपरी (Video)

रांजणगाव गणपती, ता. 27 जून 2017 (तेजस फडके): शिक्षण घेऊन व्यवसाय करण्याची जिद्द, चिकाटी व कष्ट करण्याची तयारी असेल तर यश मिळतेच. धनराज वाघ हा विद्यार्थी आयटीआयचे शिक्षण घेत चहाची टपरी चालवत घरच्या गरिब परिस्थितीला मागे हटवत आहे.आजकाल कुठंही गेलं की तरुण मुलांच्या हातात महागडे मोबाईल, फिरायला महागड्या बाईक दिसतात. अनेकजण मोबाईलवर सतत चॅटिंग करताना दिसतात. त्यामुळे आजची तरुणपिढी खुपच बिघडली अस आपण म्हणतो. पण तसे नाही. समाजात अनेक युवक असे आहेत की ते एक आदर्श घालवाना दिसतात. अशाच युवकांपैकी एक आहे तो म्हणजे धनराज वाघ.

धनराज हा कळंब (ता. रिसोड, जि. वाशिम) गावातील. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक. परंतु, शिक्षण घेऊन व्यवसाय केला तर आर्थिक परिस्थिती बदलू शकते, हा विचार धनराजने केला आणि शिक्षणाबरोबरच व्यवसायही करू लागला. धनराज कारेगाव येथील शासकीय आयटीआय मध्ये शिक्षण घेत आहे. याबरोबरच तो रांजणगाव गणपती येथील जुन्या टोलनाक्या जवळ चहाची टपरी चालवून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च स्वतःच करतोय.

धनंजयचे आई वडील मजुरीचे काम करतात. त्यामुळे दहावीनंतर तो रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कामासाठी नातेवाईकांकडे आला. परंतु, शिक्षण फक्त दहावीच असल्याने त्याला पगार जेमतेमच मिळत होता. त्यामुळे त्याने कारेगाव येथील शासकीय आयटीआय मध्ये प्रवेश घेतला. परंतु, शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न धनंजय पुढे उभा राहिला. त्यानंतर त्याने एका हॉटेलवर पार्टटाइम काम करायला चालु केलं. पण पगार फारच कमी असल्याने स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचं ठरवलं. त्याला समाजातील काही दानशूर व्यक्तींनी मदत करुन एक टपरी बनवुन दिली. पुणे-नगर महामार्गावर रांजणगाव गणपती येथील जुन्या टोल नाक्यावर महाराजा टी सेंटर नावाने त्याने टपरी चालू केली आहे.

धनंजय सायंकाळी 5 ते पहाटे 5 वाजेपर्यंत या टपरीवर चहा कॉफी विकुन स्वतःच्या शिक्षणासाठी पैसे मिळवत आहे. सकाळी 8 ते 5 आयटीआय मध्ये शिक्षण घ्यायचं... त्यानंतर टपरीवर येऊन चहा व कॉफी विकून स्वतःच्या शिक्षणासाठी पैसे मिळवायचे, असा धनंजयचा दिनक्रम चालू आहे. भविष्यात नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करण्याचा मानस आहे, असे धनंजयने www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले.

धनंजय 'कॉफी उईथ शिरूर तालुका.कॉम' या उपक्रमकात सहभागी झाला होता. व्हिडिओमधून त्याने आपला प्रवास सांगत युवकांपुढे आदर्श घालवून दिला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या